a peacock attacks a person who tries to steal a peacocks egg | Loksatta

X

कर्म तैसे फळ! मोराच्या अंड्यांची चोरी करायला गेलेल्या चोराला घडली जन्माची अद्दल; पाहा Viral Video

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत मोराने एका अंडीचोराची चांगलीच तारांबळ उडवून दिल्याचं पाहायला मिळतं आहे

कर्म तैसे फळ! मोराच्या अंड्यांची चोरी करायला गेलेल्या चोराला घडली जन्माची अद्दल; पाहा Viral Video
मोराच्या अंड्यांची चोरी करायला गेलेल्या चोराला घडली जन्माची अद्दल (Photo : Instagram)

सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात आपल्या मनोरंजनामध्ये कसलीही कमतरता भासत नाही. सोशल मीडियावर रोज अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओंमध्ये काही प्राण्यांचे आणि पक्षांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि लोकांना देखील ते खूप आवडत आहेत.

या व्हिडीओमध्ये आपणाला कधी माकडांची, मांजरांची मस्ती पाहायला मिळते. तर कधी अंगावर शहारे आणणाऱ्या जंगलातील सिंह, अस्वल यांचे व्हिडीओदेखील पाहायला मिळतात. मात्र, सध्या एका चोराला अद्दल घडवणाऱ्या लांडोर आणि मोराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मोराने एका अंडीचोराची चांगलीच तारांबळ उडवून दिल्याचं दिसतं आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये मोकळ्या जागेवर एक लांडोर आपल्या अंड्यांवर बसलेली दिसतं आहे. त्याचवेळी तेथील रस्त्यावरुन निघालेल्या एका व्यक्तीला ती अंडी दिसतात आणि तो अंडी चोरण्यासाठी लांडोरच्या दिशेने जातो. लांडोरला बाजूला सारुन तो अंडी उचलून हातात देखील घेतो.

अंडी घेऊन तो तिथून पळ काढणार तोपर्यंत त्या चोरट्याला अंडी चोरताना मोर बघतो आणि तो सुसाट वेगाने त्याच्या अंगावर झेप घेतो. मोराची झेप एवढी जोराची आहे की, त्यामध्ये हा अंडीचोर क्षणात जमिनीवर कोसळताना दिसतं आहे. शिवाय मोराने आपल्या चोचीने त्याच्यावर हल्ला करायला सुरुवात करताच तो चोर कसाबसा आपला जीव वाचवत पळ काढताना व्हिडीओत दिसतं आहे.

हेही वाचा- ज्योतिषाचा सल्ला शेतकऱ्याला पडला महागात, सापाला जीभ दाखवली अन् आयुष्यभरासाठी गमावला…

त्यामुळे चोरी करताना आपणाला कोणीतरी बघत असतेच, कर्म तैसे फळ’, अशा कंमेंट करत नेटकऱ्यांनी अंडीचोराला ट्रोल केलं आहे. या व्हिडीओतील चोर घाबरलेला असला तरी व्हिडीओ बघणाऱ्यांना मात्र आपलं हसू आवरता येत नाहीये. त्यामुळे हा व्हिडीओ अनेकांनी शेअर करत लाईक देखील केला आहे. आतापर्यंत लाखाच्यावर लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. इंस्टाग्रामवर ‘beautifulgram_to ‘ नावाच्या पेजवरही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 19:09 IST
Next Story
Optical Illusion: या फोटोत लपलेला अस्वल तुम्हाला दिसला का? उत्तर जाणून अचंबित व्हाल