समालोचन हा क्रिकेट सामन्याचा महत्वाचा भाग असून ते सामना पाहताना आनंद आणि रोमांच द्विगुणित करते. त्याच्याशिवाय क्रिकेटचा विचारच करता येणार नाही. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचे समालोचन आपण हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये ऐकले आहे. मोहल्ल्यातील क्रिकेट सामनेही प्रादेशिक भाषेत होतात. मात्र, एका व्यक्तीने या पलीकडे जाऊन थेट संस्कृत भाषेत भन्नाट समालोचन केले आहे. याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून ट्विटर यूजर्स या व्यक्तीचे कौतुक करत आहेत.

@chidsamskritam लक्ष्मी नारायण बी.एस या ट्विटर यूजरने हा संस्कृत भाषेतील समालोचनाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. व्हिडिओत काही मुले क्रिकेट खेळताना दिसत आहे. यात एक व्यक्ती संस्कृत भाषेतून क्रिकेट सामन्याची माहिती देत आहे. तसेच, क्रिकेट सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांशी तो अस्खलितपणे संस्कृतमध्ये संवाद साधत आहे.

(Viral : पर्वताखालील तंबूना हिमस्खलनाचा जोरदार तडाखा, जीव मुठीत धरून पळत सुटले गिर्यारोहक, पाहा थरारक व्हिडिओ)

विशेष म्हणजे, कॉमेंट्री करताना अचानक फलंदाज एक मोठा शॉट मारतो. याचे वर्णन ही व्यक्ती इतक्या वेगाने संस्कृत भाषेत करते की तो त्या भाषेत निपूण असल्याचे प्रत्यय येते. सामन्याचे वर्णन तो अगदी सहजपणे संस्कृत भाषेत करतो, जी ऐकताना देखील गोड वाटते. या व्हिडिओला आतापर्यंत २ लाख व्ह्यूज मिळाले आहे. हे अनोखे समालोचन पाहून नेटकरी या व्यक्तीचे कौतुक करत आहे. संस्कृत आणि क्रिकेटचे अद्भूत संगम त्याने घडवून आणले आहे.

नेटकऱ्यांनी या व्हिडिओला खूप पसंती दिली आहे. त्यानी समालोचकाचे भरपूर कौतुक केले आहे. संस्कृतमधील समालोचन ऐकायला फार गोड वाटत आहे, असे एका यूजरने लिहिले, तर एका यूजरने मला याप्रमाणे संस्कृत बोलायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली. तर एकाने संस्कृत बोलता येत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.