Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ धक्कादायक असतात. काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येते तर काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो पण सोशल मीडियावर असेही काही व्हिडीओ व्हायरल होतात जे कौतुकास्पद असतात. सध्या असाच एक केरळमधील व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्येतुम्हाला दिसेल की डॉक्टरांनी बसमध्येच गर्भवती महिलेची प्रसुती केली आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. बस ड्रायव्हरच्या तत्परतेमुळे गर्भवती महिलेला वेळीच वैद्यकीय उपचार घेता आले. काय आहे नेमके प्रकरण जाणून घ्या.

@RealBababanaras या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सांगितल्याप्रमाणे, एक ३७ वर्षीय गर्भवती महिला बसमधून प्रवास करत होती. अचानक तिला वेदना असह्य झाल्या तेव्हा बस ड्रायव्हरनी बस थेट हॉस्पिटलमध्ये आणली. आई आणि बाळ सुखरूप आहे. कॅप्शनमध्ये पुढे असेही लिहिलेय, “या चांगल्या कार्यासाठी सरकारने या बस चालकाचा सत्कार केला पाहिजे. जास्तीत जास्त प्रमाणात हा व्हिडीओ शेअर केला तर हे शक्य होईल.”

हेही वाचा : धक्कादायक! हातातील मोबाइल हिसकावल्याने पत्नीचा संताप, पतीला पलंगाला बांधून दिला विजेचा शॉक, मुलालाही केली मारहाण

नेमकं काय घडलं?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक बस अचानक हॉस्पिटलमध्ये येते आणि बसमधून कंडक्टरसह काही लोक उतरतात. आणि गर्भवती महिलेविषयी सांगतात. तेव्हा सुरुवातीला काही नर्स धावून येतात पण महिलेची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टर आणि नर्स आवश्यक सामग्री मागवतात आणि बसमध्येच महिलेची प्रसुती करतात. ही संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे फुटेज सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर बस ड्रायव्हर आणि डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. हा व्हिडीओ केरळ राज्यातील आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : आज शोले चित्रपटाचे शूटिंग झाले असते तर… युजरच्या त्या पोस्टवर आनंद महिंद्रांनीही दिलं फिल्मी स्टाईलमध्ये उत्तर

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, “काय टिमची मेहनत होती.. माणुसकी जिंकली” तर एका युजरने लिहिलेय, “बस ड्रायव्हर, कंडक्टर आणि हॉस्पिटलच्या स्टाफचा सत्कार केरळ सरकारनी सत्कार केला पाहिजे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “हॉस्पिटलचा स्टाफ खूप छान होता”