‘गरज ही शोधाची जननी आहे’, असं म्हणतात कारण आपणाला एखाद्या गोष्टीची खूप गरज असेल तर ती मिळवण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करतो. ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण अनेक पर्याय शोधतो. सध्याचा जमाना डिजीटल असल्यामुळे आपणाला कोणत्याही गोष्टीवरचा उपाय शोधणं सोपं जातं. मात्र, आजही अनेक लोक जे ग्रामीण भागामध्ये राहतात त्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा नसते. त्यामुळे हे लोकं काही अशी जुगाड करतात की त्याची दखल इंटरनेटला घ्यावी लागते.

हेही पाहा- बिबट्याचा ‘हा’ अवतार तुम्ही याआधी पाहिला नसेल, IFS अधिकाऱ्याने शेअर केलेला फोटो एकदा पाहाच

Viral video petrol is being poured into the scooter from tansen tobacco pouch
VIDEO: पेट्रोल वाचवण्यासाठी व्यक्तीने केला स्मार्ट जुगाड; भावाचा जुगाड पाहून लावाल डोक्याला हात
Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

भारतात जुगाडू लोकांची कमतरता नाही. जुगाडू लोक त्यांच्या आसपास उपलब्ध असणाऱ्या गोष्टींच्या आधारे उपयोगी आणि अवघड काम सोप करण्यासाठी काही उपकरणं तयार करतात. सध्या अशाच एका जुगाडू व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तो पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.

हेही पाहा- Video: स्ट्रेचरवर झोपवलेल्या रुग्णाला लिफ्टमधून नेताना घडली दुर्घटना; अर्ध्यावर प्रवेश करताच अचानक लिफ्ट खाली…

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील व्यक्तीने जुगाडच्या माध्यमातून एक असा रेडिओ तयार केला आहे. जो कोणत्याही बॅटरी किंवा विजेशिवाय चालू शकतो. त्यामुळे या व्यक्तीने केलेले हे जुगाड नेटकऱ्यांना चांगलंच भावलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो इंस्टाग्रामवर Nomad Trippers नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती डोंगराळ भागात गायी आणि म्हशी चरवताना दिसत आहे. त्याच्या पाठीवर सोलार पॅनल लटकवलेलं दिसतं आहे. जे पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

दरम्यान, या व्यक्तीला त्या भागात गस्त घालणारे पोलिस या रेडिओबद्दल माहिती विचारतात त्यावेळी ही व्यक्ती पोलिसांना सांगते की, ‘हा रेडीओसाठी कोणत्याही प्रकारची बॅटरी किंवा वीज लागत नाही. तर तो सोलार पॅनलमधून निर्माण होणाऱ्या उर्जेच्या साहाय्याने सुरु होतो.’ यावेळी हा व्यक्ती त्या पोलिसांना आपल्या रेडिओवर गाणंही लावून दाखवतो. सध्या या व्यक्तीच्या या भन्नाट जुगाडाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु असून अनेक नेटकरी या व्यक्तीचं कौतुक करत आहेत.