scorecardresearch

Video: डायमंड नेकलेसची चोरी करणारा उंदीर सीसीटीव्हीत कैद, IPS अधिकाऱ्याच्या प्रश्नावर नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

उंदरांबाबतच्या आपण वेगवेगळ्या बातम्या वाचत असतो, ज्यामध्ये ते कधी दारू पितात तर कधी गांजा खातात

mouse trending viral video
सोशल मीडियावर प्राण्यांचे खूप मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात ते प्रेक्षकांनाही पाहायला आवडतात. (Photo : Twitter)

सोशल मीडियावर प्राण्यांचे खूप मजेदार आणि गोंडस व्हिडीओ व्हायरल होत असतात ते प्रेक्षकांनाही पाहायला आवडतात. यामध्ये आपण कुत्रा आणि मांजरीचे व्हिडीओ सतत पाहत असतो. मात्र, सध्या एका उंदराचा भन्नाट असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल यात शंका नाही. कारण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील एक उंदीर ज्वेलरीमधून नेकलेस पळवून नेत असल्याचं दिसत आहे. अनेकांना व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर विश्वास ठेवणं कठिण जात आहे.

खरंतर उंदीर खूप खोडकर असतात, ते शेती, घर आणि ऑफिस अशा ठिकाणचं नुकसान करतात. म्हणूनच लोक उंदराच्या उपद्रवापासून मुक्त होण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत असतात. उंदरांबाबतच्या आपण वेगवेगळ्या बातम्या पाहिल्या आहेत. ज्यामध्ये ते कधी बिहारमध्ये उंदीर दारू पितात तर यूपीमध्ये गांजा खातात असं आपण सोशल मीडियावर पाहिल्या आहेत. यापेक्षा एक आगळवेगळ प्रकरण केरळमध्ये उघडकीस आलं आहे. ज्यामध्ये एका उंदराने दागिन्यांच्या शोरूममधून हिऱ्याचा नेकलेस चोरला आहे. ही सर्व घटना शोरुममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही पाहा- …अन् आजोबांनी चक्क शेळ्यांनाच गाडीला जुंपलं, देशी जुगाडाचा Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

रिपोर्टनुसार, हे प्रकरण केरळमधील कासारगोड येथील ‘किसना ज्वेलरी’ च्या शोरूममधील असून या व्हिडीओत शोरुममध्ये अनेक नेकलेस शो पीसमध्ये लावले होते. एक दिवस शोरुममधील एक नेकलेस कमी असल्याचं कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही तपासला असता तो नेकलेस उंदराने पळवल्याचं उघडकीस आलं. जे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हेही पाहा- रस्त्यावर पडलेल्या जखमी कुत्र्याला मिळाले जीवनदान; नेटकऱ्यांना भावलेला Viral Video एकदा पाहाच

हा व्हिडिओ IPS अधिकारी राजेश हिंगणकर यांनी त्यांच्या @RajeshHinganka2 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये ‘आता हा उंदीर कोणासाठी नेकलेस घेऊन गेला असेल’ असा मिश्किल प्रश्न विचारला आहे. दरम्यान, हा व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही वापरकर्त्यांनी लिहिलं आहे की, उंदराने हा नेकलेस त्याच्या गर्लफ्रेंडसाठी नेला असेल तर आणखी एकाने लिहिले आहे की, त्याचाही संसार असेल अशा वेगवेगळ्या कमेंट लोक करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 16:43 IST