Shocking video: सोशल मीडियावर नेहमीच असे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे मनोरंजक असतात, तर कधी आपल्याला माहिती देणारे असतात. तुम्ही येथे रस्ते खचल्याचे किंवा खड्डे पडल्याचे अनेक व्हिडीओ देखील पाहिले असतील. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ खरंच आश्चर्यचकीत करणारा आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांना देखील धक्का बसला आहे.उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये पाण्याच्या लाईनमुळे रस्ता खराब झाला होता, त्याचं काम सुरू असताना अचानक रस्ता खचला पाईपलाईनही फुटली. वर्षभरापूर्वी बनवलेला रस्ता २० फूट खचल्याने सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत. विशेष म्हणजे यावेळी नगरसेवक व सहा मजूर खड्ड्यात पडून जखमी झाले आहेत. भयानक दृश्य कॅमेरात कैद या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी कॅम्पसमध्ये गोंधळ घातला आणि रस्ता रोको करून संपावर बसले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, याठिकाणी पाण्याची लाईन लिकेज झाल्याने रस्ता आतून पोकळ झाला होता. अमृत योजनेंतर्गत शनिवारी त्याची दुरुस्ती सुरू झाली. रविवारी सकाळी नगरसेवक सुधीर पनवार त्यांच्या उपस्थितीत काम करून घेत असताना हा अपघात झाला. दरम्यान नगरसेवकाशिवाय ६ मजूर जखमी झाले आहेत. नगरसेवक सुधीर पवार यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून संतप्त लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस आणि लोकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. ही घटना प्रभाग क्रमांक ३४ मधील असल्याची माहिती आहे. अचानक रस्ता खचला, पाईपलाईनही फुटली अन् व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, संपूर्ण रस्त्यावर मोठा खड्डा कसा निर्माण झाला आहे आणि लोक शेजारी उभे आहेत. खड्ड्यात पडलेल्या नागरिकांना बाहेर काढले जात आहे. रस्त्याचे बांधकाम योग्य प्रकारे न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. लोकांच्या म्हणण्यानुसार, वर्षभरापूर्वी हे काम केले होते. त्यानंतर महापालिकेने रस्त्याची दुरुस्ती केली; मात्र काम नीट झाले नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पाहा व्हिडीओ हेही वाचा >> “हे फक्त भारतातल्या गाईच करु शकतात” गाईनं दाखवलेली हुशारी पाहून पोट धरुन हसाल; VIDEO एकदा पाहाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर @SachinGuptaUP नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.