सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओत प्राण्यांच्या व्हिडीओचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. कारण बदलत्या तंत्रज्ञानामुळे आपणाला अनेक प्रकारचे प्राणी सोशल मीडियाद्वारे पाहता येतात. शिवाय या प्राण्यांमधील वेगवेगळे गुणही आपणाला पाहायला मिळतात. तर कधी त्यांच्यामधील भयंकर भांडणाचे आणि शिकारीचे व्हिडीओदेखील व्हायरल होत असतात.

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तुटलेल्या झाडाच्या बुंद्यावर एक माकड बसल्याचं दिसत आहे. शिवाय या माकडाला चारी बाजूंनी सिंहाच्या कळपाने घेरल्याचं दिसत आहे. यावेळी एक सिंह या माकडाची शिकार करण्यासाठी त्या झाडाच्या बुद्यावर चढताना दिसत आहे. यावेळी भीतीने घाबरलेलं माकड जीवाच्या आकांताने त्या सिंहाला जवळ येण्यास विरोध करताना दिसत आहे. पण शेवटी सिंह त्या माकडाला आपल्या जबड्यात पकडल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Marriage to a minor girl
पुणे : अल्पवयीन मुलीशी विवाह, मारहाण करून गर्भपात; पतीसह पाचजणांवर गुन्हा

हेही पाहा- डिजेचा कर्कश आवाज ठरला नवरदेवाच्या मृत्यूचं कारण, वधुच्या गळ्यात हार घातला आणि स्टेजवरच…

सिंहाने माकडाची शिकार केल्याचा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. हा व्हिडीओ जुना असला तरी तो पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत माकड आपला जीव वाचवण्यासाठी झाडाच्या मागच्या बाजूला जाते, पण सिंहाच्या पंजातून तो सुटू शकत नाही. दरम्यान, सिंहांचा एक समूह त्या असाह्य अशा माकडाला घेरून त्याच्यावर हल्ला करतात.

हेही पाहा- Video: वहिनीच्या प्रेमात पडला, गावकऱ्यांसमोर द्यावी लागली ‘अग्निपरीक्षा’; निखाऱ्यात हात घातला अन्…

नेटकरी झाले थक्क –

हा व्हिडिओ काही लोकांना पाहणे कठीण होऊ शकते, कारण तो मन विचलित करणारा आहे. दरम्यान, सिंह शेवटी माकडाला जबड्यात धरुन घेऊन जातो. हा व्हिडीओ इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतपर्यंत या व्हिडीओला ५ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. अनेकांनी हे खूप धक्कादायक दृश्य असल्याचं म्हटलं आहे.