scorecardresearch

Premium

Viral Video : सहा महिन्याच्या चिमुकलीने सांगितले की स्वामी समर्थ कसे बसतात? व्हिडीओ होतोय व्हायरल

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अवघ्या सहा महिन्याच्या चिमुकलीने स्वामी समर्थासारखे बसून दाखवले आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहून थक्क व्हाल.

A six month old baby said how does shree Swami Samarth sit The video goes viral on instagram social media
सहा महिन्याच्या चिमुकलीने सांगितले की स्वामी समर्थ कसे बसतात? व्हिडीओ होतोय व्हायरल (Photo : Instagram)

Viral Video : देशभरातून अनेक लोक श्री स्वामी समर्थ यांची पूजा करतात आणि त्यांना मानतात. अनेक लोकांची स्वामी समर्थांवर श्रद्धा आहे. सोशल मीडियावर अनेक जण स्वामी समर्थांचे व्हिडीओ किंवा फोटो शेअर करत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अवघ्या सहा महिन्याच्या चिमुकलीने स्वामी समर्थासारखे बसून दाखवले आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहून थक्क व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकली बेडवर झोपलेली असते तेव्हा तिची आई तिला विचारते, “स्वामी कसे बसतात?” तेव्हा ती चिमुकली चक्क स्वामीसारखे बसून दाखवते. व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् होईल. विशेष म्हणजे या चिमुकलीचे वय फक्त सहा महिने आहे. या व्हिडीओवरुन तुम्हाला कळेल की लहान मुलांची अवलोकन क्षमता किती उत्तम असते.

student played with bench to hold the rythm on the harmonium played by teacher
Video : शिक्षकाच्या हार्मोनियमवर ठेका धरण्यासाठी विद्यार्थ्याने वाजवला बेंच, गुरू शिष्याच्या जुगलबंदीचा व्हिडीओ एकदा पाहाच
Karishma Kapoor Lost 25 Kgs Weight By Eating Machhi Kadhi Rice Every Night Rujuta Divekar On How To Eat carbs Benefits Of Poha
२५ किलो वजन कमी करताना करिश्मा कपूरने रात्रीच्या जेवणात खाल्ले ‘हे’ दोन पदार्थ; भातप्रेमींनो तुम्ही तर वाचाच
parents were scared by seeing a child head is seen stuck in the railing of the staircase
बापरे! क्षणभरासाठी आई वडील घाबरले, खोडकर चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून डोकं धराल
26 Year Old mother burns baby to death inside oven after claiming she mistook it for a crib Jhula Crime News Today Shocking Incident
एका महिन्याच्या बाळाला आईनेच चालू ओव्हनमध्ये ठेवलं कारण.. पोलिसांनी सांगितला हादरवून टाकणारा घटनाक्रम

हेही वाचा : तहानलेल्या कावळ्याची गोष्ट तुम्ही पुस्तकात वाचली असेल, पण आता प्रत्यक्षात सुद्धा पाहा, चतुर कावळ्याचा व्हिडीओ व्हायरल

darshana_shivlakshmi या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “श्री स्वामी समर्थ…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी या व्हिडीओवर ‘श्री स्वामी समर्थ…’चा जयघोष केला आहे. काही युजर्सनी चिमुकलीचे कौतुक सुद्धा केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A six month old baby said how does shree swami samarth sit the video goes viral on instagram social media ndj

First published on: 27-11-2023 at 10:43 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×