scorecardresearch

Premium

VIDEO : बापरे! चक्क उशीमध्ये लपून बसला होता साप, व्हिडीओ पाहून थरकाप उडेल

मानवी वस्तीमध्ये अनेकदा साप दिसून येतात. अशावेळी आपण सर्पमित्राला बोलवतो. या व्हिडीओमध्ये सुद्धा सर्पमित्राने अत्यंत हुशारीने साप पकडलेला दिसून येत आहे.

shocking viral video on instagram
चक्क उशीमध्ये लपून बसला होता साप (Photo : sarpmitra_kiran/Instagram)

Snake Viral Video : साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सापाची भीती वाटते. सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सर्पमित्र त्यांच्या अकाउंटवरुन अनेक व्हिडीओ शेअर करत असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो.
सध्या असाच एक सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसेल की साप चक्क उशीमध्ये लपलेला होता. मानवी वस्तीमध्ये अनेकदा साप दिसून येतात. अशावेळी आपण सर्पमित्राला बोलवतो. या व्हिडीओमध्ये सुद्धा सर्पमित्राने अत्यंत हुशारीने साप पकडलेला दिसून येत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका खोलीतील आहे. एका बेडवर एक मुलगा पांघरुन घेऊन झोपलेला असतो. तितक्यात सर्पमित्र येतात आणि त्या मुलाला झोपेतून उठवतात. त्याच्या शेजारच्या बेडवर एक उशी पडलेली असते. या उशीमध्ये चक्क साप लपून बसलेला व्हिडीओत दिसतोय. सर्पमित्र हळूच साप बाहेर काढतो आणि खोली बाहेर नेतो. व्हिडीओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा येऊ शकतो.

Monkey torture
माकडाला झाडावर उलटे टांगून अनन्वित अत्याचार; वन्यजीवप्रेमींकडून कारवाईची मागणी
Man finds worm crawling in orange he bought from Zepto Company issues refund
Zeptoवरून मागवलेल्या संत्र्यामध्ये व्यक्तीला सापडली जिवंत अळी! पाहा, कपंनीने मागितली माफी
a street vendor boy made Maggi with coffee and milk
‘कॉफीवाली मॅगी!’ तरुणाने चक्क कॉफीमध्ये शिजवली मॅगी, मॅगीच्या विचित्र रेसिपीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Delhi Salon firing shot dead २
दिल्लीतल्या सलूनमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, दोघांची हत्या, CCTV VIDEO व्हायरल

हेही वाचा : पाणी पुरी खायला आवडते? हा व्हायरल व्हिडीओ पाहून पाणी पुरी खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल

sarpmitra_kiran या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलेय, “झोपताना काळजी घ्या. थंड वातावरण असल्यामुळे साप घरामध्ये येऊ शकतो.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तस्कर जातीचा साप आहे. पूर्णपणे बिनविषारी असतो”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A snake rescuer took the snake was hiding in the pillow shocking viral video on instagram social media ndj

First published on: 05-10-2023 at 17:04 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×