वाढत्या महागाईमुळे जनता हैराण झाली आहे. महागाईचा चटका सर्वांनाच बसत आहे. आतापर्यंत दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींनी जनता हैराण झाली होती. मात्र आता लिंबाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे या उन्हाळ्यात लोकांचे हाल झाले आहेत. या उन्हाळ्यात जिथे लोकांना लिंबाची सर्वाधिक गरज असते, तिथे महागाईमुळे सर्वसामान्यांना लिंबू खरेदी करणे कठीण झाले आहे. लिंबाच्या किमतीवर सोशल मीडियावर अनेक विनोदही केले जात आहेत. लोक मजेदार मीम्स आणि जोक्स शेअर करत आहेत.

आता एका भाजी विक्रेत्याचे गाणं सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो लिंबाच्या वाढलेल्या किमतीवर पंजाबीमध्ये गाणं गात आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये भाजी मंडईत एक भाजीविक्रेता महागाईवर गाणं गाताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये भाजीवाला पंजाबीमध्ये मस्त स्टाईलमध्ये गाताना दिसत आहे, “लिंबू कँडे मैनु हाथ लगाई ना, मिर्च बोला कुछ दिन मैनु खाई ना, तेल भी कंदी टँकी भरवी ना, कहवे सिलिंडर मैनु आग लगगा ना… ” अशा काही गाण्याच्या ओळी तुम्हाला ऐकायला मिळतील. या व्यक्तीच्या गाण्यासोबत त्याची शैलीही नेटीझन्सला आवडत आहे.

(हे ही वाचा: वराने वरमाळा घालताच, वधूने मारली कानाखाली आणि…; Video Viral)

(हे ही वाचा: सुंदरबनमधील वाघाचा बोटीतून उडी मारतानाच हा Viral Video एकदा बघाच!)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ @ShabnamHashmi नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ६ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लोक त्या व्यक्तीचे कौतुक करत आहेत आणि व्हिडीओवर अनेक कमेंट करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले – जबरदस्त, उत्कृष्ट. दुसर्‍याने लिहिले – त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे.