४ जुलै रोजी मुंबईतील T20 विश्वचषक विजयाची परेड ही एक संस्मरणीय घडामोडी ठरली ज्यामध्ये मुंबईच्या रस्त्यांवर आणि वानखेडे स्टेडियमवर बहुप्रतिक्षित विश्वचषक विजय साजरा करण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. स्मरणीय असा सोहळा सुरळीतपणे पार पडण्यासाठी अनेकांनी मेहनत घेतली होती. यामध्ये मुंबई पोलिसांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. कारण मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मोठी गर्दी झाली होती की कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळणे सोपे नव्हते. पण मुंबई पोलिसांनी नेहमीप्रमाणे कौतुकास्पद कामगिरी केली. मुंबई पोलिसांच्या कामगिरीची कौतूक विराट कोहसी सह अनेकांनी केली. पोलिसांच्या कामाची दखल घेतल्याबद्दल मुंबई पोलिसांनी देखील आभार व्यक्त केले आहे. या स्टार भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने पोलिसांच्या समर्पणाची आणि कर्तवदक्षतेचे कौतूक केले आणि विजय परेड सुरळीत पार पाडण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल आदर व्यक्त केला. एक्सवर पोस्ट करत त्यांने मुंबई पोलिसांचे आभार व्यक्त केले. पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ""टीम इंडियाच्या विजय परेडमध्ये अभूतपूर्व कामगिरी केल्याबद्दल @MumbaiPolice आणि @CPMumbaiPolice चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे मनापासून आदर आणि मनःपूर्वक आभार. तुमचे समर्पण आणि सेवा अत्यंत प्रशंसनीय आहे.?? जय हिंद !" हेही वाचा - आनंद महिंद्रांनी केलं मुंबई महापालिकेचं तोंडभरून कौतूक! विजयोत्सवानंतर अशी झाली होती मरिन ड्राईव्हची अवस्था, पाहा Video Viral https://twitter.com/imVkohli/status/1809120208390430843?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1809120208390430843%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=about%3Ablank दरम्यान मुंबई पोलिसांनी नागरिकांनी व्यक्त केलेल्या कृतज्ञतेबद्दल आभार व्यक्त केले. एक्सवर पोस्ट करताना कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, निळ्याशार लाटेला खाकीची सुरक्षा! काल मरीन ड्राईव्ह व वानखेडे येथे मुंबई पोलिसांच्या बंदोबस्ताने भारतीय क्रिकेट संघ व त्यांच्या चाहत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी निभावली त्याबाबत नागरिकांनी व्यक्त केली कृतज्ञता! प्रेम आणि कौतुकाबद्दल धन्यवाद, मुंबई!" सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट करत मुंबई पोलिसांच्या कामाचे कौतूक केले. एकाने लिहिले की, तुम्ही संघाचे स्वागत करण्यासाठी आलेल्या समर्थकांच्या समुद्रात अक्षरशः प्रत्येकाला सुरक्षित ठेवले !! सर्व अधिकारी, कर्मचारी QRT संघ संरक्षण शाखेचे अधिकारी आणि ट्रॅफिक पोलीस साबांच्या #विजयप्रेड दरम्यान ड्युटीवर असलेल्या प्रत्येकासाठी टाळ्या." हेही वाचा - शेवटी आईचं ती! रस्त्याच्याकडेला बाळाला घेऊन बसलीये महिला, आईचा लेकरावर प्रेमाचा वर्षाव, पाहा हृदयस्पर्शी Video Mumbai Police Virat Kohli दुसरा म्हणाला, "खूप चांगले काम केले, तुमच्या सर्व मेहनतीबद्दल आभार". मना पासून धन्यवाद