Premium

VIDEO : “तुझमे रब दिखता है…” गाण्यावर विद्यार्थ्याने शिक्षकांबरोबर केला डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवतील तुमचे शाळेचे दिवस

या व्हिडीओत एक विद्यार्थी “तुझमे रब दिखता है…” या गाण्यावर शिक्षकांसह डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तु्म्हालाही तुमच्या शिक्षकांची किंवा शाळेची आठवण येऊ शकते.

a student danced with female teachers on tujh mein rab dikhta hai song
"तुझमे रब दिखता है…" गाण्यावर विद्यार्थ्याने शिक्षकांबरोबर केला डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवतील तुमचे शाळेचे दिवस (Photo : Instagram)

Viral Video : माणसाच्या आयु्ष्यात शाळा हा खूप महत्त्वाचा टप्पा असतो. शाळेच्या आठवणी आयुष्यभर स्मरणात राहतात. शाळेतील मित्र, मैत्रिणी, शिक्षकांबरोबर घालवलेले क्षण कायम लक्षात राहतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक शाळेतील व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत एक विद्यार्थी “तुझमे रब दिखता है…” या गाण्यावर शिक्षकांसह डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तु्म्हालाही तुमच्या शिक्षकांची किंवा शाळेची आठवण येऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हायरल व्हिडीओ शाळेच्या एका वर्गखोलीतील आहे. एका बाजूला बाकांवर शिक्षिका बसलेल्या आहेत, तर आजूबाजूच्या बाकांवर विद्यार्थी बसलेले आहेत. व्हिडीओमध्ये पुढे दिसेल की एक विद्यार्थी “तुझमे रब दिखता है…” गाण्यावर सुंदर डान्स करत आहे.
डान्स करताना मध्ये मध्ये तो सर्व शिक्षकांच्या पाया पडतो. पुढे एका शिक्षिकेबरोबर तो डान्ससुद्धा करतो. या विद्यार्थ्याचा डान्स पाहून सर्व विद्यार्थी आणि सर्व शिक्षिका टाळ्या वाजवताना व्हिडीओत दिसतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या शाळेच्या दिवसांची आठवण येऊ शकते.

हेही वाचा : Optical Illusions : लोकांच्या गर्दीत विराट कोहली दिसतो का? एकदा नीट क्लिक करून पाहा

हा व्हिडीओ ajaysingh2.4 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “ते पण काय दिवस होते.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “शालेय जीवन आयुष्यातील सर्वात चांगला काळ असतो. ते दिवस कधीही परत येत नाही”, तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान डान्स केला.” आणखी एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून मला माझ्या शाळेतील शिक्षकांची आठवण आली.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A student danced with female teachers on tujh mein rab dikhta hai song you will remember your childhood and miss school days after watching video goes viral ndj

First published on: 23-09-2023 at 17:27 IST
Next Story
जम्मू-काश्मीरमध्ये लेन बदलण्याच्या नादात व्हॅनमधील चौघांचा गेला जीव; भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल