Viral Video : आई वडील हे मुलांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती असतात. आईचे गोडवे आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो पण वडीलांविषयी फार काही बोलले जात नाही. आईप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात वडीलांचे योगदान खूप मोठे आहे. कठोर वागून मुलावर प्रेम करणारा, मुलांच्या चांगल्या आयुष्याचा विचार करणारा आणि कधीही व्यक्त न होणारा वडील प्रत्येकाला उमजत नाही. अनेकदा वडील गेल्यानंतर वडीलांचे महत्त्व कळते. सोशल मीडियावर वडीलांविषयी प्रेम व्यक्त करणाऱ्या अनेक मुलांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ भावुक करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक शाळकरी चिमुकला वडीलांविषयी बोलताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक विद्यार्थी भाषण देत आहे आणि शाळेतील अन्य विद्यार्थी या विद्यार्थ्याचे भाषण ऐकत आहे. या विद्यार्थ्याच्या शेजारी युवा व्याख्याता वसंत हंकारे सुद्धा उभे आहेत. विद्यार्थी सांगतो, “अपघातात माझे वडील वारले त्यामुळे माझी आजी असताना मी कोपरगावमध्ये राहिलो. कोपरगावचा प्रॉपर मी. वडील वारल्यानंतर मला माझ्या मामांनी सांभाळलं. मला एक मोठा भाऊ आहे. आशुतोष. दिवाळीला सर्वांचे वडील बघताना नवीन कपडे घेऊन देतात माझे मामा सुद्धा सर्व करतात. सर्व मुलं त्यांच्या वडीलांबरोबर फोटो काढतात सर. मामांनी कधी आमच्या वडीलांची कमतरता भासू दिली नाही पण कुठेतरी वडीलांची कमतरता भासते मी काही जास्त बोलू शकत नाही. ” त्यानंतर हा विद्यार्थी वसंत हंकारे यांना मिठी मारून रडताना दिसतो. त्याचे हे बोलणे ऐकून शाळेतील अन्य विद्यार्थी सुद्धा रडताना दिसतो. हा भावुक करणारा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Suicide student Nagpur, Suicide of 12th student,
अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
mother emotional video sad stories of elderly mother
“माझं कोणी नाही रडायला….” वृद्ध आईचे ते शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी; काळजाला भिडणारा VIDEO तुम्हाला काय वाटत?
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Representative Image
“मी अभ्यास करू शकत नाही, हे माझ्या आवाक्याबाहेर…” कोटामध्ये IIT प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
pune Mobile filming was done in washroom of girls school
रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांकडून तोडफोड, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की प्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा
Bengaluru Crime News
मुलांना विष पाजलं, स्वत:ही केली आत्महत्या; बंगळुरूत दाम्पत्याचं धक्कादायक कृत्य; मरणापूर्वी लिहिला सविस्तर ईमेल!

हेही वाचा : VIDEO:”काही क्षणांसाठी आयुष्याचा खेळ करु नका” नवरदेवाला ग्रँड एन्ट्री पडली महागात; थेट फेट्याला आग लागली अन् पुढच्याच क्षणी…

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

वसंत हंकारे यांनी त्यांच्या vasant_hankare_3232 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बाप गेल्यानंतर हे सगळं अनुभवावं लागतं जे मी ही लहानपणी अनुभवलेलं आहे..”

हेही वाचा : कॉलेजमध्ये ज्या आवाजावर हसायचे, त्याच आवाजाने दिली रेल्वेत नोकरी! महिलेच्या आवाजात घोषणा करणारा हा तरुण आहे तरी कोण?

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आई-वडिलांशिवाय आयुष्य नाही” तर एका युजरने लिहिलेय, “सगळं अनुभवलं आई-वडील नसताना काय घडते ते कोण पण साथ देत नाही फक्त आई वडील सोडलं तर कोणी कोणाचा नसतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरचं डोळ्यात चटकन पाणी आले …..आई वडिलांची कमतरता कोणी पूर्ण करू शकत नाही” एक युजर लिहितो, “जो पर्यत आई वडील आहे मित्रांनो त्यांना जपा नाही तर नंतर आठवणी भास देतात स्पर्श नाही.”

Story img Loader