scorecardresearch

बायकोच्या मृत्यूनंतर टॅक्सी चालकाने असं काही केलं की…, रात्रीत बनला करोडपती

एक टॅक्सी चालक रात्रीत करोपडपती बनला असून तो करोपडपती होण्याला त्याच्या बायकोचं वय कारणीभूत ठरलं आहे.

बायकोच्या मृत्यूनंतर टॅक्सी चालकाने असं काही केलं की…, रात्रीत बनला करोडपती
माणसाचं आयुष्य कधी आणि कसं बदलेल हे सांगता येत नाही. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

माणसाचं आयुष्य कधी आणि कसं बदलेल हे सांगता येत नाही. कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की त्यांचे नशीबचं पालटून जातं. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. ज्या घटनेत एक टॅक्सी चालक रात्रीत करोपडपती बनला आहे आणि त्याला कारणीभूत ठरलं आहे त्याच्या बायकोचं वय, हे वाचून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका टॅक्सी चालकाचे त्याच्या पत्नीच्या वयाचा क्रमांक वापरून दोन लॉटरीची तिकीटं विकत घेतली होती. हीच लॉटरीची तिकीटं त्याला करोडपती बनवण्यास कारणीभूत ठरली आहेत. त्यामुळे ‘एखाद्या पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो’ असं म्हणतात. पण या ठिकाणी या पुरुषामागे त्याच्या पत्नीचं वय आहे, पण दुर्दैवाने त्याच्या पत्नीचा हात मात्र, त्याच्या पाठीमागे नाही.

हेही वाचा- Ludo च्या नादात नवऱ्याला कंगाल करुन बाईने स्वतःचीच लावली बोली; आता नाईलाजास्तव घरमालकासोबत…

याचं कारण टॅक्सी चालकाने सांगितले तो म्हणाला, “माझ्या पत्नीचं गेल्याच आठवड्यातच निधन झालं, शिवाय मी माझ्या पत्नीच्या वयाचा क्रमांक वापरून दोन लॉटरीची तिकिटं खरेदी केली होती. ही दोन्ही तिकिटं एकाच नंबरची होती. माझ्या सुदैवाने मी घेतलेल्या नंबरची लॉटरी लागल्यामुळे मी एवढ्या मोठ्या रकमेचा मालक बनलो आहे. पण यामागे माझ्या मृत पत्नीचा मोलाचा वाटा आहे.”

या टॅक्सी चालकाने लॉटरीत 12 मिलियन Baht म्हणजेच सुमारे २ कोटी ८० लाख रुपये जिंकले आहेत. TheThaiger च्या वृत्तानुसार, ही घटना थायलंडमधील बँकॉकची आहे. लॉटरी जिंकलेल्या व्यक्तीची ओळख अद्याप उघड झालेली नाही. मात्र, बक्षीस जिंकल्यानंतर टॅक्सी चालकने आपण ही रक्कम कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी वापरणार असल्याचं सांगितलं. बक्षीस जिंकल्यावर टॅक्सी चालक भावूक झाला त्याने आपल्या मुलीला जाराची मिठी मारली. त्यावेळी त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही पाहा- Viral Video: मगर आली आणि चिमुकल्याला घेऊन गेली, हतबल वडिलांनी डोळ्यादेखत पाहिला मुलाचा दुर्दैवी अंत

दरम्यान, टॅक्सी चालकाला काही पत्रकारांनी टॅक्सी चालवणं बंद करणार का? असा प्रश्न विचारा असता तो म्हणाला, याबाबत आपण अजून काही निर्णय घेतलेला नाही. मला सर्वात आधी मिळालेल्या पैशांना मिठी मारायला आवडेल, असं उत्तर त्याने पत्रकारांना दिलं. सोशल मीडियावर टॅक्सी चालक करोडपती झाल्याच्या बातमीची जोरदार चर्चा सुरु असून कोणाचं नशीब कधी पालटेल हे सांगता येत नाही, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 17:43 IST

संबंधित बातम्या