Viral Dance Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्व जण बिनधास्त डान्स करताना दिसतात. शाळा कॉलेजातील मुलांचे सुद्धा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक विद्यार्थी चक्क त्याच्या शिक्षकाबरोबर डान्स करताना दिसत आहे. दोघांचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका कॉलेजातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक विद्यार्थी डान्स करताना दिसेल. तितक्यात त्याला थांबवतात आणि त्याचे शिक्षक डान्स करायला पुढे येतात. हे पाहून तो मुलगा सुद्धा खूप उत्साही होतो आणि त्यानंतर विद्यार्थी शिक्षकाची ही जोडी बिनधास्त डान्स करायला सुरूवात करते. त्या दोघांचा डान्स पाहून कोणीही अवाक् होईल. “यूपी वाला ठुमका लगाऊ की हीरो जैसे नाच के दिखाऊ” या लोकप्रिय गाण्यावर विद्यार्थी आणि शिक्षक डान्स करतात. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाप पाहून कोणीही थक्क होईल. त्यांचा डान्स पाहून जमलेले विद्यार्थी आणि शिक्षक त्यांना प्रोत्साहन देताना दिसून येतात. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांचे कॉलेजातील शिक्षकांची आठवण येईल तर काही लोकांना कॉलेजचे दिवस आठवेल.

हेही वाचा : “ओ स्त्री कल फिर आना” दुकानाच्या पाटीवर लिहिली टॅगलाईन, दुकान मालकाची मार्केटिंग स्टाइल पाहून व्हाल अवाक्

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Pune Video : दगडूशेठ गणपतीच्या आरतीला हजर राहायचे? टेन्शन घेऊ नका, हा व्हायरल व्हिडीओ पाहा अन् घरबसल्या घ्या आरतीचा लाभ

iamadarshag या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “त्यांच्याबरोबर डान्स करताना छान वाटले” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आवडत्या शिक्षकाबरोबर डान्स करणे, हा जगातला सर्वात मोठा आनंद असतो” तर एका युजरने लिहिलेय, “विद्यार्थी शिक्षकांचे तरुणपणीचे व्हर्जन वाटत आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “असे शिक्षक सुद्धा असतात का? एक युजर लिहितो, “असे शिक्षक कुठे भेटतात?” तर एक युजर लिहितो, “एकनंबर, व्हिडीओ पाहून मजा आली” अनेक युजर्सना शिक्षकाचा डान्स खूप आवडला. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.