Viral Video : लहान मुलांना बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्यापासून रोखणं अनेक पालकांना कठीण जाते. पण, जर लहान मुलांना योग्य वेळी कोणते पदार्थ खायचे याचे महत्व पटवून दिल्यास ते बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्यास हट्ट करत नाहीत; तर असंच काहीसं एका व्हायरल व्हिडीओत पहायला मिळालं आहे. हॉटेलमध्ये एक चिमुकली तिच्या बाबांना फ्रेंंच फ्राईज खाण्यापासून थांबवते आहे आणि वेटरसोबत जाऊन मजेशीर संवाद साधताना दिसून आली आहे.
व्हायरल व्हिडीओ एखाद्या हॉटेलचा आहे. सुरुवातीला एक चिमुकली हातात फ्राईज घेऊन चालत येताना दिसते आहे. तसेच हातातले फ्राईज ती हॉटेलमधील वाढपीला (waiter) परत देते. हे पाहून वेटर गुडघ्यावर बसतो आणि चिमुकलीला विचारतो, फ्राईज का परत दिले ? त्यावर चिमुकली बाबा खूप जास्त फ्राईज खातात म्हणून फ्राईज परत देते आहे असे म्हणते. यावर वेटर चिमुकलीला, ‘मग तू पण फ्राईज खाणार नाहीस का?’ असे विचारतो. त्यावर चिमुकली मी स्ट्रॉबेरी खाणार असे सांगते. कारण- ‘स्ट्रॉबेरी जंक फूड नाही आहे, फ्राईज जंक फूड आहे’. फ्राईज खाल्ल्यानंतर पोटात दुखते आणि उलटीसुद्धा होते असे चिमुकली सांगताना दिसते आणि हा संवाद टेबलावर बसलेले चिमुकलीचे बाबा टक लावून ऐकत असतात. वेटर आणि चिमुकलीचा मजेशीर संवाद एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…
व्हिडीओ नक्की बघा :
हॉटेलमध्ये वेटरला दिले फ्राईज परत :
बटाट्यांपासून तयार करण्यात आलेला फ्रेंच फ्राईज हा पदार्थ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. तर व्हिडीओत चिमुकली आणि तिचे बाबा हॉटेलमध्ये बसलेले असतात आणि त्यांच्या समोर काही चटपटीत खाद्यपदार्थ ठेवलेले असतात. हे बघून चक्क चिमुकलीच तिच्या बाबांना फ्राईज खाण्यापासून रोखते आहे; जे एका दृष्टीने बघायला गेलात तर अगदी बरोबर आहे. कारण लहान मुले मोठ्यांकडे बघून अनेक गोष्टी शिकत असतात. अशातच आपण बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळले तर लहान मुलेसुद्धा बाहेरचे पदार्थ खाण्याचा हट्ट करणार नाहीत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @hanayaadmom यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून अनेकजण चिमुकलीची प्रशंसा करत आहेत, तर एक युजर ‘ही आजकालची मुलं सगळी हाॅटेल बंद करून टाकणारं बहुतेक’ असं म्हणत आहे. तर अनेकजण चिमुकलीचे व्हिडीओतील हावभाव बघून तिचे चाहते झाले आहेत.