डोसा हा घरातील सर्वांचा आवडीचा पदार्थ. साऊथ इंडियन फूड म्हंटलं की एक वेगळीच मज्जा असते. त्यातही डोसा आवडत नाही असं कुणी शोधुनही सापडणार नाही. अनेक घरांमध्ये नाश्त्यासाठी गृहिणी मोठ्या आवडीने डोसा बनवण्याचा प्रयत्न करतात. पण हॉटेलसारख्या डोशासारखा दिसत नाही, अशी तक्रार येत असतेच. पण आता हॉटेलसारख्या परफेक्ट गोल आकारात डोसा बनवणं सहज शक्य होणार आहे. कारण हुबेहूब हॉटेलसारखा गोल आकारातला डोसा बनवण्याची एक मशीन बाजारात येणार आहे. तुम्हाला विश्वास नसेल होत हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

साऊथ इंडिअन हॉटेलमध्ये निरनिराळ्या प्रकारचे डोसे मिळतात. डोसा प्रकार पाहून आणि ऐकूनच तुमचे पोट भरू शकते. पण जेव्हा तुम्ही घरात असा कुरकुरीत डोसा बनवण्याचा प्रयत्न करता तेव्हा मात्र, त्याचा आकार हॉटेलमधल्या डोसासारखा गोल आकार का येत नाही, यामुळे तुम्ही त्रस्त झाला असाल. पण आता चिंता करण्याची गरज नाही. कारण रोटी मेकर पाठोपाठ आता बाजारात डोसा मेकरची मशीन येणार आहे. या मशीनमध्ये परफेक्ट गोल आकाराचे लुसलुशीत डोसे बनवता येतात ते ही काही सेकंदात. यात डोसा बनवण्याची प्रोसेस सुद्धा अगदी सोपी आहे.

नुकतंच व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा पॅनमध्ये डोशाचं पीठ ठेवताना दिसून येतोय. त्यानंतर मशीनचं झाकण बंद करून ठेवतो. मग झाकणावर बसवलेले धातूचे हँडल हाताने गोल फिरवताना दिसून येतोय. हे हॅंडल जसंच आपण गोल फिरवू लागतो तस तसं पॅनमधलं पीठ देखील गोल आकारात पसरून अगदी हॉटेलमध्ये बनतो तसा परफेक्ट गोल आकारात डोसा तयार होतो. अशी नवीन आणि साधी सोपी मशीन सोशल मीडियावर व्हायरल होणार नाही, असं कधीच होणार नाही! याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून डोसा प्रेमींची मोठ्या प्रमाणात पसंती मिळतेय. नेमकी ही मशीन आहे तरी कशी आणि यात डोसा कसा बनवायचा, हे जाणून घेण्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : कॉलेजमध्ये सॅक-बेड आणि गोधडी घेऊन आली ही विद्यार्थीनी; पाहून प्रत्येकजण हैराण

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :

हा व्हिडीओ मुस्तफा नावाच्या व्यक्तीने त्याच्या लिंक्डइन प्रोफाइल आणि ट्विटरवर शेअर केला आहे. मुस्तफा हे खरं तर ID Fresh Food India Pvt. Ltd चे सीईओ आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, “गेली १५ वर्ष मी डोसा बनवण्याचा व्यवसाय करतोय, पण आजही जेव्हा मी डोसा बनवतो तेव्हा कधी कधी ऑस्ट्रेलिया देशाच्या नकाशाचा आकार येतो आणि कधी कधी भारत देशाचा नकाशा…”

आणखी वाचा : ओळखा पाहू या टोपीचा रंग कोणता ? हिरवा की तपकिरी? रंग बदलणाऱ्या टोपीचा VIDEO VIRAL; तुम्हाला काय दिसतंय ?

यापुढे त्यांनी लिहिलं, “आमच्या तांत्रिक नवकल्पनाचं हे एक उदाहरण आहे, जो माझ्यासारख्या अनेकांना डोसा बनवण्यासाठी मदत करेल. आयडी डोसा मेकर, माझे सह-संस्थापक अब्दुल नाझर यांची कल्पना असलेली ही मशीन लवकरच बाजारात येणार आहे”.

हा ३० सेकंदाच्या जाहिरातीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओला आतापर्यंत ९ लाख ५६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. तर ३३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओ लाईक करत डोसा मेकर मशीन बनवणाऱ्याचं कौतुक केलं आहे. गृहिणी असो की बॅचलर, हा डोसा बनवणाऱ्या प्रत्येकाचंच काम सोपं होणार आहे. पण डोसा कसा बनवायचा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या व्हिडीओसोबत डोसा बनवण्याची रेसिपी सुद्धा देण्यात आलीय.