nique ground Reporting by a School girl : आजच्या जगात कॅमेऱ्यासमोर उभे राहून कॉन्टेटच्या नावाखाली विचित्र स्टंटबाजी, नृत्य आणि निरर्थक गोष्टी करणाऱ्यांची कमी नाही. पण असे मोजकेच लोक असतात जे या तंत्रज्ञानाचा योग्य प्रकारे वापर करतात. हेच दर्शवणारा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये शाळकरी मुलींनी मोबाईलचा वापर करून असे काही केले जे भल्या भल्यांना जमले नाही.

व्हायरल व्हिडीओमध्ये भरपावसात चिखल-पाण्याने भरलेल्या रस्त्यावरून काही शाळकरी मुली नेहमीप्रमाणे प्रवास करताना दिसतात. त्यांच्या हातात छत्री, पाठीवर दप्तर अन् चेहऱ्यावर एक खोडकर हास्य दिसत आहे. पण त्या दिवशी त्या केवळ प्रवास करत नव्हत्या, तर असा काही भन्नाट प्लॅन त्यांच्या डोक्यात शिजत होता, ज्याचा धमाका थेट सोशल मीडियावरून राजकीय वर्तुळात होणार होता! त्यांनी सहज म्हणून मोबाईलचा कॅमेरा ऑन केला आणि एका छत्रीलाच चक्क ‘माईक’ बनवून ऑन-कॅमेरा रिपोर्टिंग सुरू केली. त्यांच्या या रिपोर्टिंगमध्ये इतका महत्त्वाचा मुद्दा होता की ज्यामुळे थेट प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवण्यात आलेहोते. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना त्यांचे कौतुकही वाटले आणि सरकाराचे कामकाज पाहून संतापही आला.! पण पुढे काय घडलं? या छोट्याशा व्हिडिओने थेट मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील यंत्रणेची झोप कशी उडवली? चला पाहूया…

“रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?” – चिमुकल्यांचा खोचक सवाल! (Potholes on the Road or Road in Potholes? – The Kids’ Sharp Question!)

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खांडपे-कोंडीवडे या रस्त्याची पावसाळ्यात दुरवस्था झाली होती. या रस्त्यावरून जाताना शाळेच्या गणवेशातील काही मुलींनी एक व्हिडिओ बनवला. एका हातात छत्रीचा माईक पकडून नेहा घारे ही विद्यार्थिनी रिपोर्टर बनली, तर मानसी पवारने कॅमेरापर्सनची भूमिका निभावली. नेहाने तिच्या मैत्रिणीला रस्त्याबद्दल विचारले असता, मैत्रिणीने उपरोधाने थेट समृद्धी महामार्गाशी तुलना करत म्हटलं, “हा रस्ता म्हणजे अगदी समृद्धी महामार्गच! यावरून जाताना पोटातलं पाणीसुद्धा हलत नाही.” तर कॅमेरा धरलेल्या तिसऱ्या विद्यार्थिनीने रस्त्याकडे मोबाईल फिरवत, “रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे, हेच कळत नाहीये!” असा टोलाही लगावला.

व्हायरल व्हिडिओ आणि आमदार महोदयांची तातडीची धावपळ (Viral Video Forces Local MLA into Immediate Action)

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि काही तासांतच ट्रेंड होऊ लागला. नेटकऱ्यांनी या शाळकरी मुलींच्या कल्पकतेचे आणि धीटपणाचे कौतुक करत प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. व्हिडिओचा धुराळा थेट राजकीय वर्तुळात पोहोचल्याने स्थानिक शिवसेना आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांना तात्काळ याची दखल घ्यावी लागली. आमदार महोदयांनी क्षणाचाही विलंब न करता त्या ठिकाणी खडी टाकून तात्पुरते खड्डे बुजवून घेण्याचे आदेश दिले, जेणेकरून तिथून वाहने सुरक्षितपणे जाऊ शकतील.

पावसानंतर नवा रस्ता; चिमुकल्यांच्या रिपोर्टिंगचा ‘रॉक’ शो! (New Road Promised After Monsoon; The Girls’ Reporting Rocks!)

मुसळधार पावसामुळे रस्त्याचा काही भाग वाहून गेल्याचे स्पष्टीकरण आमदार थोरवे यांनी दिले असून, पावसाळा संपताच येथे नवीन पक्का रस्ता तयार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. व्हिडिओच्या शेवटी “मी रिपोर्टर नेहा घरे आणि सोबत कॅमेरापर्सन मानसी पवार…” असं म्हणून हटक्या स्वॅगने निरोप घेणाऱ्या या चिमुकल्यांना आपण इतका मोठा बदल घडवून आणू असा अंदाजही नव्हता. पण त्यांच्या एका छोट्याशा छत्रीच्या माईकने अन् उत्तम रिपोर्टिंगने प्रशासनाला भल्याभल्या गप्प बसवणाऱ्यांना कामाला लावले, हे मात्र नक्की!

आदित्य ठाकरेंनी फोनवरून केलं विद्यार्थींनीचे कौतुक (Aditya Thackeray praised the students over the phone.)

Video Viral झाल्यानंतर या रिपोर्टिंगची दखल युवासेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेतली. आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थिनींशी फोनवरून संवाद साधत त्यांच्या धाडसाचं आणि कामाचं कौतुक केलं.