scorecardresearch

Premium

गावाकडच्या गोष्टी! झाडावर दिवा लावण्याची गावाकडची अनोखी पद्धत, VIDEO होतोय व्हायरल

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गावाकडची दिवे लावण्याची अनोखी पद्धत दाखवली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

a unique way of lighting diyas on tree in villages
झाडावर दिवा लावण्याची गावाकडची अनोखी पद्धत, व्हिडीओ होतोय व्हायरल (Photo : Instagram)

Viral Video : अनेक जण नोकरी आणि शिक्षणासाठी गाव सोडून शहराकडे येताना दिसतात पण गाव हे गाव असते. तेथील जीवनशैली, जीवन जगण्याची पद्धत, जेवण आणि सवयी या जगावेगळ्या असतात. सोशल मीडियावर गावाकडील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गावाकडची दिवे लावण्याची अनोखी पद्धत दाखवली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये झाडावर दिवा लावण्याची हटके पद्धत दाखवली आहे. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे, गावाकडच्या काकू शेणाच्या मदतीने झाडाच्या खोडावर दिवा साकारताना दिसत आहे. त्यानंतर या दिव्यावर फूलांनी सजावट सुद्धा करतात. पुढे व्हिडीओत एक चिमुकली रात्रीच्या अंधारात येताना दिसते आणि या झाडाच्या खोडावर पेटलेला दिवा ठेवते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही ही अनोखी पद्धत करावीशी वाटेल.

police women struggles to meet her baby child for just 2 minute
VIDEO : शेवटी आईचं काळीज! फक्त २ मिनिटे लेकीला भेटण्यासाठी हिरकणीची धडपड; पोलीस कर्मचारीचा व्हिडीओ व्हायरल
Why is it imperative to have medical tests before marriage Here are 7 Important Medical Tests a Couple Must Undergo Is it safe to marry in same blood group
कुंडली जुळेलही; पण आरोग्याचे काय? लग्न करण्याआधी कोणत्या टेस्ट कराव्यात? रक्तगट बघावा का?
an old lady wish to do makeup before going to chemotherapy
उद्याची वाट पाहू नका, प्रत्येक क्षण जगा! केमोथेरपी करण्यापूर्वी आजीची होती मेकअप करायची इच्छा, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
parents were scared by seeing a child head is seen stuck in the railing of the staircase
बापरे! क्षणभरासाठी आई वडील घाबरले, खोडकर चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून डोकं धराल

हेही वाचा : लहानपण देगा देवा.. मित्रांना बैल बनवून लावली बैलगाडा शर्यत, पाहा व्हायरल व्हिडीओ

nature_beauty_1208 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गावाकडची दिवे लावण्याची पद्धत…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खुप छान. पहिल्यांदाच पाहिलं असे काहीतरी” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान यामुळे झाडाला नुकसान पण नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “आपली संस्कृती आपला अभिमान”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A unique way of lighting diyas on tree in villages video goes viral village life ndj

First published on: 01-12-2023 at 17:30 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×