scorecardresearch

गायीच्या वासराला सीट बेल्ट लावून कारमधून फिरवणाऱ्या तरुणीचा Video व्हायरल; नेटकरी म्हणाले, “आपल्या देशाची…”

अनेक तरुण-तरुणी घरातील पाळीव प्राण्यांना कारममधून फिरायला घेऊन जाताना आपण पाहिलं आहे

गायीच्या वासराला सीट बेल्ट लावून कारमधून फिरवणाऱ्या तरुणीचा Video व्हायरल; नेटकरी म्हणाले, “आपल्या देशाची…”
व्हिडीओतील तरुणी चक्क गायीच्या वासराला कारमधून फिरायला घेऊन जात असल्याचं दिसत आहे. (Photo : Twitter)

सध्याच्या तरुणाईचे मुक्या प्राण्यांवर प्रेम आहे ही खूप समाधानाची बाब आहे. अनेक तरुण-तरुणी आपल्या घरात कुत्रा मांजर यासारखे प्राणी पाळतात. त्यांच्यासोबत फोटो काढतात शिवाय त्यांना आपल्या कारममधून फिरायलादेखील घेऊन जात असतात. शिवाय असे अनेक प्राणीप्रेमीं आपणाला ट्रॅफिक सिग्नलवर थांबल्यावर दिसतात, ज्यांच्या कारमध्ये कुत्रा किंवा मांजर असतो.

पण सध्या सोशल मीडियावर अशा एका प्राणीप्रेमीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो याआधी तुम्ही कदाचित पाहिला नसेल. कारण तुम्ही आजपर्यंत कारमधून कुत्रा किंवा मांजराला फिरायला घेऊन जाणारे अनेक लोक पाहिले असतील. पण या व्हिडीओतील एक तरुणी चक्क गायीच्या वासराला आपल्या कारमधून फिरायला घेऊन जात असल्याचं दिसत आहे.

हेही पाहा- Video: वंदे भारत एक्सप्रेसमध्ये सेल्फी काढण्याचा मोह नडला, इच्छा नसताना १५० किमीचा प्रवास घडला

हा घटनेचा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडला असून, हे दृश्य खरंच खूप सुंदर असल्याचं नेटकरी कमेंटमध्ये म्हणत आहेत. व्हायरल होत असलेली ही व्हिडीओ क्लिप २४ सेकंदांची आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसून व्हिडिओ शूट करतेय, सुरुवातीला ती कॅमेरा स्वतःकडे दाखवते नंतर तिच्या शेजारीच कारच्या पुढच्या सीटवर बसलेल्या वासराला दाखवते. शिवाय या तरुणीने वासराची पुरेपुर काळजी घेतल्याचंही दिसत आहे. कारण तिने वासराला सीट बेल्टही बांधलेला दिसत आहे.

महत्वाची बाब म्हणजे हे वासरु कॅमेऱ्याकडेही खूप प्रेमाने आणि निरागसतेने बघत आहे की ते पाहून अनेक नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडीओ @PrabhaUpadhya21 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुव शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘आपण नेहमी कुत्रे आणि मांजरींना महागड्या कारमधून फिरताना पाहिलं आहे. आज पहिल्यांदाच कोणीतरी एवढ्या आदराने आणि प्रेमाने गाईच्या वासराला फिरायला घेऊन जाताना पाहिलं, हीच आपल्या देशाची महान परंपरा आहे.’ हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाखांहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. शिवाय अनेकजण यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. एका व्यक्तीने, ‘राधे-राधे’ लिहिलं आहे, तर आणखी एकाने ‘यालाच अतिशय सुंदर क्षण असं म्हणतात, असं लिहिलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-01-2023 at 10:36 IST

संबंधित बातम्या