scorecardresearch

भाकरी नळाला धुवून खाणाऱ्या आजोबांचा Video पाहून नेटकरी झाले भावूक; म्हणाले “परिस्थितीला कधीच…”

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणतीही व्यक्ती अन्न वाया घालवणार नाही आणि आपल्या परिस्थितीला नावेही ठेवणार नाही

भाकरी नळाला धुवून खाणाऱ्या आजोबांचा Video पाहून नेटकरी झाले भावूक; म्हणाले “परिस्थितीला कधीच…”
व्हायरल होणाऱ्या आजोबांचा व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. (Photo : Twitter)

अनेक लोक आपल्या परिस्थितीवर नाराज असतात. त्यांना सतत दुसऱ्यांच्या राहणीमानाचं आणि त्यांच्या आरामदायी जीवणाचं कौतुक वाटतं. शिवाय श्रीमंत मित्रांच्या तुलनेत आपण खूपच कमी असल्याची तक्रार ते खासगीत करत असतात. मात्र, आपल्या आजुबाजूला काही लोक असेही असतात ज्यांना दोन वेळेचं जेवणही मिळत नाही. अशा लोकांना पाहिल्यावर अनेकांना आपण खूप सुखी असल्याचं जाणवतं. जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना जगण्यासाठी दररोज नवा संघर्ष करावा लागतो.

सध्या सोशल मीडियावर अशाच एका आजोबांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसांच्या मुलभूत गरजा असतात. ते मिळविण्यासाठी प्रत्येकजण दररोज कष्ट करत असतो. मात्र, अनेक लोकांची परिस्थिती इतकी वाईट असते की त्यांना आपल्या मुलभूत गरजा भागवणंही कठीण जातं. असे लोक आपाणालाअ अन्नाच्या शोधात कधी कचऱ्याच्या डब्यामध्ये डोकावताना दिसतात. जे पाहून आपणालाही खूप वाईट वाटतं.

हेही वाचा- “कधी TV पाहिला नाही आणि रेस्टॉरंटमध्येही…”, हिरे व्यापाऱ्याच्या ८ वर्षाच्या लेकीने घेतला संन्यास

सध्या असाच एक हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक आजोबा रेल्वे स्टेशनवर भाकरी खाताना दिसत आहे. पण ते ज्या पद्धतीने भाकरी खात आहेत, ते पाहून प्रत्येक व्यक्तीला धान्याच्या एका एका दान्याचे महत्त्व समजेल यात शंका नाही. कारण या व्हिडिओमध्ये एक गरीब वयोवृद्ध आजोबा रेल्वे स्टेशनवर असणाऱ्या पाण्याच्या नळाखाली भाकरी धुताना दिसत आहे. शिवाय धुतलेली भाकरी नंतर ते खाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ जुना असून तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही पाहा- नवरदेवाला फसवायला गेलेल्या मेव्हणीने स्वत:चीच फजिती करुन घेतली, व्हायरल Video पाहून हसू आवरणार नाही

नेटकऱ्यांना भावला व्हिडीओ –

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता कोणतीही व्यक्ती अन्न वाया घालवणार नाही आणि आपल्या परिस्थितीला नावेही ठेवणार नाही. @Sihnaparody नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, ‘आयुष्यावर माझ्या अनेक तक्रारी होत्या मात्र, हे दृश्य पाहून मी तक्रारी करणं बंद केलं आहे.’ हा व्हिडीओ पाहून अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्यांनी खूप सुंदर अशी कमेंट केली आहे. त्याने लिहिलं आहे की, ‘आपण थोडे प्रयत्न केले तर काही लोकांची भूक नक्कीच भागवू शकतो.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 16:43 IST

संबंधित बातम्या