scorecardresearch

“आता वैताग आलाय…”, ‘सूर्यवंशम’ पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकाने थेट TV चॅनेललाच लिहिलं पत्र

सोशल मीडियावर सूर्यवंशम चित्रपटाच्या सततच्या टेलिकास्टवरून अनेक मीम्स व्हायरल होत असतात

“आता वैताग आलाय…”, ‘सूर्यवंशम’ पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकाने थेट TV चॅनेललाच लिहिलं पत्र
२२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने टीव्हीवर टेलिकास्ट होण्याचा जणू रेकॉर्डच केला आहे. (Photo : Facebook, Loksatta)

टीव्हीवर तुम्हाला अनेकदा एकच चित्रपट लागल्याचं पाहायला मिळालं असेल. मात्र, सर्वात जास्त वेळा कोणता चित्रपट टीव्हीवर दाखवला गेला असेल, तर तो म्हणजे ‘सूर्यवंशम’. जवळपास २२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने टीव्हीवर टेलिकास्ट होण्याचा जणू रेकॉर्डच केला आहे. या चित्रपटातील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना फार चांगल्या प्रकारे लक्षात आहेत. अनेकांना चित्रपटातीस प्रमुख भूमिकांचे संवाद तोंडपाठ झाले आहेत.

सोशल मीडियावर सूर्यवंशम चित्रपटाच्या सततच्या टेलिकास्टवरून अनेक मीम्स व्हायरल होत असतात. मात्र, या चित्रपटाच्या सततच्या टेलेकास्टला कंटाळून आता एका व्यक्तीने थेट सोनी मॅक्स चॅनेलला पत्र लिहिले आहे, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डीके पांडे नावाच्या व्यक्तीने हे पत्र लिहिले आहे.

हेही पाहा- दोन मांजरींचा बाईकवरील प्रवासाचा Video होतोय व्हायरल, नेटकरी म्हणतायत ‘विश्वास आणि प्रेम…’

पत्रात लिहिले आहे की, ‘आम्हाला चित्रपटाची संपूर्ण कथा कळाली आहे. हीरा ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबातील राधा, गौरी यांच्याबाबतची सर्व माहिती चांगल्याप्रकारे मिळाली आहे. आता आम्हाला जाणून घ्यायचे आहे की, हा चित्रपट सेट मॅक्स वाहिनीवर कधीपर्यंत प्रसारित केला जाणार आहे.’ व्हायरल होत असलेले हे पत्र, रजत कुमार नावाच्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलं आहे. हे पत्र नेटकऱ्यांना चांगलंच भावलं असू न आतापर्यंत या फोटोला आतापर्यंत ५१ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तर दिड हजारांहून अधिक लोकांनी या पत्रावर कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा- ऑर्डर पोहोचवण्यासाठी गेला तो परतलाच नाही, कुत्र्याच्या भीतीने Swiggy बॉयने तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी

नेटकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये एका यूजरने लिहिलं आहे की, ‘राधा अजूनही नोकरीवर आहे की निवृत्त झाली आहे, हे देखील या पत्राद्वारे विचारा.’ तर ‘आता माझा मुलगाही बस विकत घेण्यास सांगत आहे.’ अशी कमेंटही एका नेटकऱ्याने केली आहे. या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी या चित्रपटाचे तोंडभरून कौतुकही केलं आहे. एका व्यक्तीने म्हटलं आहे की, ‘काहीही म्हणा पण हा सिनेमा कितीही वेळा पाहिला तरी कमीच आहे. कारण तो अत्यंत प्रेरक असा सिनेमा आहे.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 19:46 IST

संबंधित बातम्या