scorecardresearch

Premium

VIDEO: लिफ्टमध्ये एकटी महिला दिसताच पुरुषाच्या मनात आलं पाप, चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताच महिलेने शिकवला धडा

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पुरुष लिफ्टमध्ये महिलेबरोबर घाणेरडे कृत्य करताना दिसत आहे.

A woman assaulted a person who misbehaved in the lift
चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्याला महिलेने शिकवला धडा. (Photo : Twitter)

दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. दररोज सोशल मीडियावर महिलांवर झालेल्या अत्याचाराशी संबंधित अनेक बातम्या पाहायला आणि वाचायला मिळतात. देशासह जगाच्या कानाकोपऱ्यात महिलांबरोबर घडणाऱ्या गैरवर्तनाच्या अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत. कडक कायदे आणि पोलीस यंत्रणा सज्ज असतानाही अशा घटना कमी होताना दिसत नाहीत. पण महिलांनी दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वत:चं रक्षण स्वत: करण्याची गरज आहे असं अनेकदा म्हटलं जातं, याचेच उदाहरण समोर आलं आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती लिफ्टमधील महिलेशी गैरवर्तन करताना दिसत आहे. यावेळी महिलेने त्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका लिफ्टमध्ये महिला आणि पुरुष दोघेच दिसत आहेत. लिफ्टमध्ये दोघांशिवाय कोणीही नाही, त्यामुळे महिला तिच्या मोबाईलवर व्हिडिओ पाहत तिचा मजला येण्याची वाट पाहत आहे. लिफ्टमध्ये महिला एकटी असल्याचं पाहून पुरुषाच्या मनात तिची छेड काढण्याचा विचार येतो. त्यामुळे तो महिलेच्याजवळ जातो आणि तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला महिला घाबरते आणि त्याच्यापासून लांब जाऊन उभी राहते. परंतु तो माणूस तिच्या खांद्यावर हात टाकण्याचा प्रयत्न करतो.

Optical Illusion
Optical Illusion : या फोटोमध्ये धोनी दिसतोय का? नीट क्लिक करून पाहा
wildlife expert and biologist terrifying video
जंगलात व्हिडीओ शूट करतानाच व्यक्तीच्या अंगावर पडली वीज; थरारक घटनेचा VIDEO होतोय व्हायरल
The rickshaw puller's trick,
कहरच केला राव! चक्क खूर्चीवर बसून रिक्षा चालवतोय हा माणूस; VIRAL फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल
aryan-khan-bobby deol
शाहरुखच्या मुलाच्या वेब सीरिजबद्दल मोठी अपडेट; आर्यन खानच्या प्रोजेक्टमध्ये बॉबी देओल साकारणार मुख्य भूमिका

हेही पाहा- हद्दच झाली राव! प्रेयसी हातावर चावल्याच्या आठवणीत प्रियकराने काढला टॅटू, VIDEO पाहून संतापले नेटकरी म्हणाले…

महिलेने शिकवला धडा –

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, महिला त्या माणसापासून लांब जाताच तो पुन्हा तिच्या जवळ जाऊन गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करतो. धक्कादायक बाब म्हणजे तो तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे महिला रागवते आणि त्याचा हात झटकून त्याच्या गालावर जोरात थप्पड मारते. शिवाय ती इतकी रागवते की थप्पड मारल्यानंतर न थांबता त्याला दोन लाथादेखील मारते. त्यानंतर तो व्यक्ती खाली पडतो. शिवाय त्याला योग्य तो धडा शिकवल्यानंतर महिला लिफ्टमधून बाहेर निघून गेल्याचंही दिसत आहे. हा व्हिडीओ पाहताच अनेक नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. शिवाय महिलेने केलेली कृती योग्य आणि कौतुकास्पद असल्याचंही ते म्हणत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A woman assaulted a person who misbehaved in the lift video goes viral social media jap

First published on: 01-10-2023 at 09:48 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×