Viral Video : सोशल मीडिया कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतात तर कधी धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतात. कधी कोणी हटके जुगाड सांगतात तर कधी कोणी अविश्वसनीय गोष्टी करून दाखवतात. काही व्हिडीओ पाहून खळखळून हसायला येते तर काही व्हिडीओ हे अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका नवरीने रडता रडता अचानक असे काही केले की पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्हाला नवरी एका रिक्षामध्ये बसलेली दिसेल. लग्नानंतर विदाई सोहळ्यातील हा क्षण आहे. नवरी सासरी जात असते. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नवरीच्या दोन्ही बाजूने दोन महिला बसल्या आहेत आणि नवरी ढसा ढसा रडत आहे. नवरीला रडताना पाहून रिक्षा बाहेर उभे असलेल्या लोकांना आणि तिच्या दोन्ही बाजूला बसलेल्या महिलांना वाईट वाटत आहे आणि ते सुद्धा रडत आहे. पुढे तिच्या शेजारी बसलेली एक महिला तिला म्हणते की रडू नको. दोन तीन दिवसानंतर येऊ. यानंतर महिला अचानक जोरजोराने हसताना दिसते. नवरीला अचानक खळखळून हसताना पाहून कोणीही अवाक् होईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. रडताना असे अचानक बदललेले नवरीचे रूप पाहून कोणालाही धक्का बसेल. व्हिडीओ पाहून काही लोकांना हसू सु्द्धा येईल. सध्या या व्हिडीओची सर्वत्र चर्चा आहे.

Pune video
Pune : “भाऊ, गरम काय आहे?” ग्राहकाने विचारताच पुणेकर विक्रेत्याने दिले भन्नाट उत्तर, VIDEO पाहून पोट धरून हसाल
a man carries Hand Cart Pushers in heavy rain
“माणूस त्याच्या कुटुंबासाठी काहीही करू शकतो” भर पावसात हातगाडी वाहून नेणाऱ्या काकांचा VIDEO होतोय व्हायरल
Makeup Tips for perfect gajra hairstyle
Makeup Tips : परफेक्ट गजरा कसा माळायचा? पाहा व्हायरल VIDEO
Palak Pulao Recipe
Palak Pulao Recipe : असा बनवा झटपट होणारा चवदार पालक पुलाव, भन्नाट रेसिपीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
The boy jumps from the terrace for the reel he got Severe neck injury stunt video goes viral
रिलच्या नादात मुलाने गच्चीवरून मारली उडी; मानेला गंभीर दुखापत, व्हायरल होतोय VIDEO
Flood Bridge Collapse Viral Video Suddenly Death In Just 2 Seconds
‘आयुष्यात एका सेकंदाचं महत्त्व काय?’ एका पावलाच्या अंतरावर होत्याचं नव्हतं झालं; ‘हा’ VIDEO बघून उडेल झोप
a bride wear varmala to groom a suddenly a third person come watch what happen next
VIDEO : क्षणात होत्याचे नव्हते झाले! नवरी नवरदेवाला वरमाला घालणार तितक्यात तिसरी व्यक्ती मध्येच आली अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ
old parents need your time
वृद्ध आई वडिलांना फक्त तुमचा वेळ हवा असतो! “मला काहीही नको फक्त तू पाहिजे” आजोबा लेकीचा संवाद व्हायरल, पाहा ह्रदयस्पर्शी VIDEO

हेही वाचा : Rahu Mangal Yuti : राहु मंगळ युती संपली, ‘या’ तीन राशी होऊ शकतात करोडपती, मिळणार बक्कळ पैसा

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : स्मृती इराणींच्या पराभवानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल; युजर्सच्या ‘अशा’ प्रतिक्रिया वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल

@PalsSkit या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्याता आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “स्त्री कधी रूप बदलणार, याचा काही नेम नाही. तुम्हाला वाटते की तुमची पत्नी अशी नाही तर तुम्हाला गैरसमज आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतितक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “गिरगिटची राजमाता” तर एका युजरने लिहिलेय, “ती स्त्री आहे, सर्व काही करू शकते” आणखी एका युजरने लिहिलेय, “काय अभिनय आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.