Premium

हीच खरी माणुसकी! तहानलेल्या कुत्र्याला सुपलीतून पाणी पाजतेय सफाई कामगार महिला, रेल्वे स्टेशनवरील व्हिडीओ व्हायरल

कुत्रा हा माणसाच्या अतिशय जवळचा प्राणी आहे. त्यामुळे मानवी वस्तीत तो सहजपणे वावरताना दिसून येतो. पाळीव कुत्र्यांची मालक विशेष काळजी घेतात पण भटक्या कु्त्र्यांकडे कुणीही फारसे लक्ष देत नाही पण अशाच एका भटक्या तहानलेल्या कुत्र्याला पाणी पाजताना ही सफाई कामगार महिला दिसत आहे.

a Woman cleaner offer water to A thirsty dog at railway station
हीच खरी माणूसकी! तहानलेल्या कुत्र्याला सुपलीतून पाणी पाजतेय सफाई कामगार महिला (Photo : Instagram)

Viral Video : रेल्वे स्टेशनवरील अनेक व्हिडीओ चर्चेत येत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्टेशनवरील सफाई कामगार महिला एका कुत्र्याला पाणी पाजताना दिसत आहे. तिचा हा दयाळूपणा पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
कुत्रा हा माणसाच्या अतिशय जवळचा प्राणी आहे. त्यामुळे मानवी वस्तीत तो सहजपणे वावरताना दिसून येतो. पाळीव कुत्र्यांची मालक विशेष काळजी घेतात पण भटक्या कु्त्र्यांकडे कुणीही फारसे लक्ष देत नाही पण अशाच एका भटक्या तहानलेल्या कुत्र्याला पाणी पाजताना ही सफाई कामगार महिला दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की सफाई कामगार महिला रेल्वे स्टेशनवरील कचरा स्वच्छ करताना दिसत आहे. अचानक तिच्यासमोर कुत्रा येतो आणि कुत्रा तहानलेला असतो पण या महिलेला सुचत नाही की या कुत्र्याला पाणी कसे पाजावे. तेव्हा ती अनोखी युक्ती शोधून काढते आणि कचरा उचलणाऱ्या सुपलीतून कुत्र्याला पाणी पाजते. नळाजवळ जाऊन सुपलीत पाणी आणते आणि कुत्र्याला पाणी पाजताना ती दिसते. सध्या हा व्हिडीओ पाहून कुणालाही या महिलेचं कौतुक करावसं वाटेल.

हेही वाचा : हीच खरी माणुसकी! चिमुकल्या मुलांनी वाचवला कुत्र्याचा जीव, व्हिडीओ होतोय व्हायरल

miss_jugadu या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दयाळूपणा आणि करूणा जपा आणि एकोप्याने राहा. माणूसकीची ताकद सहानभूतीमध्ये दिसून येते.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “किती दयाळू आहे” तर एका युजरने लिहिलेय, “हृदयस्पर्शी व्हिडीओ” तर आणखी एका युजरने लिहिलेय, “तुमच्यावर देवाचा आशीर्वाद असो”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A woman cleaner offer water to a thirsty dog at railway station video goes viral on instagram ndj

First published on: 07-12-2023 at 12:14 IST
Next Story
या आनंदापुढे सगळं फिकं; मुलाला पोलिसांच्या गणवेशात पाहून आईला अश्रू अनावर; हृदयस्पर्शी VIDEO व्हायरल