Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ तर अचंबित करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही धक्का बसेल कारण या व्हिडीओमध्ये एक महिला तिच्या डोक्यावर चक्क दोन सिलेंडर आणि त्यावर एक हंडा उचलून डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही पण हे खरंय. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. (a woman dances with two cylinder and on handa on head stunt video goes viral)

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला साडी नेसून डान्स करताना दिसत आहे. तिने डोक्यावर चक्क दोन सिलेंडर आणि त्यावर एक हंडा ठेवला आहे. तिच्या डोक्यावरील एवढा भार पाहून तुम्हीही थक्क व्हाल. विशेष म्हणजे डोक्यावर एवढा भार उचलत ती डान्स करताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. ती डान्सचा आनंद लुटताना दिसत आहे. तुम्ही स्टंटचे अनेक व्हिडीओ पाहिले असेल पण असा स्टंटचा व्हिडीओ तुम्ही कदाचित पहिल्यांदा पाहाल.

हेही वाचा : PHOTO: ट्रॅफिकमध्ये विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांना ‘आपला नम्र, एक पुणेकर’ म्हणत जबरदस्त टोला; पुणेरी पाटी पाहून पोट धरुन हसाल

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : ‘श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी’; डिलिव्हरीदरम्यान महिलेनं गायलं श्रीकृष्णाचे भजन; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “हिच्या प्रेमाची कधीही तुलना…”

कोण आहे ही महिला?

या महिलेचे नाव नीतू आहे आणि ती तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ती अनेक व्हिडीओमध्ये डोक्यावर भार उचलून डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. तिला हजारो लोक फॉलो करतात.

_neetu_5650 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या महिलेनी हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “या महिलेला ऑस्कर पुरस्कार द्यावा” तर एका युजरने लिहिलेय, “नारी शक्तीला खूप मोठा सलाम” एका युजरने विचारलेय, “हे सिलेंडर डोक्यावरती ठेवले कसे आणि डोक्यावरून उतरवले कसे? आणखी एका युजरने लिहिलेय, “हे टॅलेंट भारतात दिसू शकते.” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर आश्चर्य व्यक्त केले आहेत तर काही युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.