Viral Video : मैत्री हे खूप सुंदर नाते आहे. लहानपणीची मैत्री असो किंवा कॉलेजची मैत्री असो ही नेहमी खास असते. करिअर, नोकरी आणि लग्नामुळे अनेकदा जुन्या मित्र मैत्रीणींना भेटता येत नाही पण त्यांच्या आठवणी कायम मनात राहतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला तिच्या एका जुन्या मैत्रीणीला भेटताना दिसत आहे. चक्क १५ वर्षानंतर ती मैत्रीणीला भेटली. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या शाळा कॉलेजातील मित्र मैत्रीणी आठवतील तर काहींना त्यांना भेटायची इच्छा होईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल एक महिला तिच्या मैत्रीणीला भेटायला तिच्या घरी जाते. त्यानंतर ती एका ठिकाणी लपते. पुढे जेव्हा मैत्रीण तिच्या समोर येते तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा असतो. दोघीही एकमेकींना घट्ट मिठी मारतात. दोघींच्या चेहऱ्यावरील हसू पाहून तुम्हीही भावूक व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “तब्बल १५ वर्षांनी एकमेकींना भेटल्यानंतर या पेक्षा वेगळे काही अपेक्षित नसावं”

हेही वाचा : VIDEO : हेल्मेट घातले म्हणून वाचला; अंगावर काटा आणणारा अपघाताचा व्हिडीओ होतोय व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : गाडीचा फुटला आरसा, चालकाने केला असा जुगाड की VIDEO पाहून पोट धरून हसाल

या महिलेनी himalini_sakore या तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हा व्हिडीओ माझी खास मैत्रीण स्नेहा भुट्टाडाने काढला आहे” या व्हिडीओवर ‘तेरे हवाले’ हे सुंदर गाणं लावलं आहे. व्हिडीओ पाहून कोणीही भावूक होईल.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कसले भारी वाटले असेल. व्हिडीओ पाहूनच डोळे भरून आले” तर एका युजरने लिहिलेय, “१५ वर्षानंतर … व्हिडीओ पाहून भावूक झाली” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी माझ्या मैत्रीणीशिवाय १ दिवस सुद्धा राहू शकत नाही. १५ वर्षे कसं काढणार”