Viral Video : आपण महत्त्वाच्या काही गोष्टी एकत्र ठेवतो; जेणेकरून गरज लागेल तेव्हा त्या लगेच सापडण्यास मदत होते. पण, तरीसुद्धा कधीतरी घाई-गडबडीत आपण चुकीची वस्तू घेऊन निघून जातो आणि काहीतरी भलतंच घडतं. आज सोशल मीडियावर असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. एक महिला आय ड्रॉपची आणि नेल ग्लु (Nail Glue) यांची बाटली एकाच ठिकाणी ठेवते. डोळ्यात ड्रॉप टाकायची वेळ येते तेव्हा ती चुकून नेल ग्लुची बाटली उचलते व काही थेंब डोळ्यात टाकते आणि तिचा एक डोळा चिकटतो.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, महिला एका डोळ्यावर कापड ठेवून बसली आहे. कारण- महिलेसोबत एक मजेशीर प्रकार घडला आहे. तिने स्वतःचे आय ड्रॉप आणि नेल ग्लु यांची बाटली एकाच ठिकाणी ठवलेली असते. आय ड्रॉप, नेल ग्लू यांची बाटली दिसायला एकसारखीच आणि अगदी लहान आकाराची असते. तर, डोळ्यात ड्रॉप टाकण्यासाठी महिला बाटली उचलायला जाते आणि चुकून नेल ग्लुची बाटली उचलते; जी दिसायला अगदीच आय ड्रॉप सारखी असते. महिला चुकून नेल ग्लुची बाटली उचलते व काही थेंब डोळ्यात टाकते आणि तिचा एक डोळा चिकटतो. महिला घडलेला प्रकार व्हिडीओत हसत सांगताना दिसते आहे. डोळ्यात आय ड्रॉपच्या जागी नेल ग्लु टाकल्यामुळे महिलेचा डोळा कसा चिकटला एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…




व्हिडीओ नक्की बघा :
आय ड्रॉप समजून टाकला नेल ग्लु अन् चिकटला एक डोळा :
महिलेचं नाव जेनिफर असे आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कशा प्रकारे चुकून डोळ्यात नेल ग्लु टाकल्यामुळे महिलेचा एक डोळा चिकटला आहे. महिलेनं डोळ्यात नेल ग्लुचा थेंब टाकताच तिचा एक डोळा लगेच बंद होतो आणि चिटकतो तसेच डोळ्याची आग होत असल्यामुळे महिला डोळ्यावर कापड ठेवून डोळा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @cctvidiots या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘आय ड्रॉप समजून महिलेनं डोळ्यात नेल ग्लु टाकला’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून अनेक जण अज्ञात महिलेबद्दल चिंता व्यक्त करीत आहेत. कधी कधी घाई-गडबडीत केलेली एखादी गोष्ट आपल्याला इजा पोहोचवू शकते, असे आज या व्हायरल व्हिडीओत आपल्याला पाहायला मिळालं आहे.