धावत्या एक्स्प्रेसमध्ये चढत असतानाच थकवा आल्याने वृद्ध महिलेचा हात सुटला अन् त्यानंतर…; पहा धक्कादायक व्हिडीओ

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे

Express, Kalyan Station, RPF,
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे

एक्स्प्रेसमध्ये चढत असताना थकवा आल्यामुळे महिला हात निसटून प्लॅटफॉर्मवर पडल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने तिथे उपस्थित असणाऱ्या आरपीएफ जवानाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे वृद्ध महिलेचा जीव वाचला. कल्याण रेल्वे स्थानकात ही घटना घडली आहे.

कल्याणवरून पुण्याला जाण्यासाठी सरुबाई कासुरडे (७१) दुपारी कल्याण स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4/5 वर उभ्या होत्या. ट्रेन आली असता त्या चढण्यासाठी पुढे सरसावल्या. मात्र थकवा आला असल्याने त्यांचा हात निसटला आणि त्या खाली पडल्या. यावेळी एक्स्प्रेस धावत असल्याने त्या खाली जाण्याची भीती होती. मात्र त्याचवेळी प्लॅटफॉर्मवर असणारे आरपीएफ कर्मचारी उपदेश कुमार यांनी क्षणाचाही विलंब न लावता धाव घेत महिलेला ट्रेनपासून दूर खेचले.

उपदेश कुमार यांनी प्रसंगावधान दाखवल्याने सरुबाई कासुरडे यांचा जीव वाचला. सरुबाई कासुरडे या पुण्यातील काकडे नगर येथील रहिवासी आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: A woman passenger saved by rpf constable at kalyan station sgy