Viral Video : असं म्हणतात, परिस्थिती माणसाला जगायला शिकवते. प्रत्येक जण पोटा पाण्यासाठी संघर्ष करत असतो. आपल्या आजुबाजूला असे अनेक लोक असतात, जे आपल्याला बरंच काही शिकवून जातात. काही लोक तर अनेक प्रेरित करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ एका युजरने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला भर पावसात फुलांचे हार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तु्म्ही सुद्धा भावूक व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (a woman selling flowers in the heavy rain video goes viral on social video)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला धो धो पाऊस पडत असल्याचे दिसेल. व्हिडीओत तुम्हाला एक फुले विक्रेता महिला दिसेल. ती भर पावसात फुलांपासून हार तयार करताना दिसत आहे. एवढं असून सुद्धा तिच्या चेहऱ्यावर निराशा नाही. व्हिडीओच्या शेवटी तुम्हाला तिच्या चेहऱ्यावरील गोड हास्य सुद्धा दिसेल. या व्हिडीओवर लिहिलेय, “यांचे कठीण परिश्रम नेहमी आम्हाला कधीही न थांबण्यास आणि हार न मानण्यास प्रेरित करतात.”

हेही वाचा : बाप्पा सर्वांना आपला वाटतो! गणपतीच्या मूर्तीकडे एकटक पाहत होती महिला अन् अचानक डोळे भरून आले, पाहा भावुक करणारा VIDEO

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

kushi__kothari या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हेच लोक मला कधीही हार मानू नको, अशी प्रेरणा देतात. मेहनतीचे नेहमीच फळ मिळते.”

हेही वाचा : Video : पुणेकरांनो, आता घरबसल्या मानाच्या गणपतींचे घ्या दर्शन! एका क्लिकवर पाहा प्रसिद्ध गणपती मंडळाचे देखावे

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तिचे गोड हसू पाहा.” तर एका युजरने लिहिलेय, “महत्त्वाचं म्हणजे तिला तिच्या कामातून समाधान मिळते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “हृदयस्पर्शी व्हिडीओ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये एक माणूस भर पावसात हातगाडी वाहून नेत होता. त्या व्हायरल व्हिडीओमध्ये दाखलले होते की एका सिग्नलवर गाड्या थांबल्या आहे आणि जोरदार पाऊस सुरू आहे. या भर पावसात हा माणूस हातगाडी घेऊन सिंग्नलवर थांबला आहे आणि पावसात भिजत हिंमतीने सिग्नलवर हातगाडी घेऊन उभा आहे. त्या माणसाचा संघर्ष पाहून लोक भावुक झाले होते.