रस्त्यावरील भांडणांचे अनेक व्हिडीओ आपण पाहत असतो. सोशल मीडियावर हे व्हिडीओ बरेच व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हे प्रकरण नोएडा येथील असून या व्हिडीओमध्ये आपण एक महिला एका रिक्षाचालकाला कानाखाली मारत असताना पाहू शकतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला आहे आणि या महिलेच्या कृत्यावर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. तिने असे का केले हे आपण जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो, कशाप्रकारे ही महिला त्या रिक्षाचालकाला मारहाण करत आहे आणि रिक्षाचालक मात्र तेथे निमूटपणे उभा आहे. महिला या चालकाला त्याच्या कॉलरला धरून कारजवळ घेऊन गेली आणि त्याला थप्पड मारण्यास सुरुवात केली. या व्हिडीओमध्ये ही महिला या रिक्षाचालकाला जवळपास १७ थप्पड मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी या महिलेच्या कृत्यावर संताप व्यक्त करत आहेत.

स्कुटीच्या आतमध्ये कसा शिरला ‘हा’ विषारी साप? Rescue Operation चा Video Viral

नोएडा पोलिसांनी शनिवारी एका महिलेला सार्वजनिक ठिकाणी रिक्षा चालकाला मारहाण केल्याप्रकरणी अटक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपी महिलेचे नाव किरण सिंह असून ती नोएडा येथील रहिवासी आहे. किरणच्या वॅगन कार आणि रिक्षामध्ये झालेल्या किरकोळ अपघातानंतर ही घटना घडली.

ही महिला रिक्षाचालकाला त्याच्या कॉलरने पकडून तिच्या कारवरील अपघाताच्या खुणा दाखवताना दिसत आहे. पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

Viral Video : गर्दीच्या रस्त्यामधून वाट काढण्यासाठी पट्ठ्याने लढवली गजब शक्कल; असा देशी जुगाड तुम्ही कधी पाहिला का?

यावेळी एका अधिकाऱ्याने सांगितले, “महिला कारमधून खाली उतरली आणि तिने रिक्षाचालकाला अनेकवेळा चापट मारली.” व्हायरल व्हिडीओमध्ये आरोपी महिला केवळ ९० सेकंदात किमान १७ वेळा चालकाला थप्पड मारताना दिसत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A woman slaps a rickshaw driver 17 times in 90 seconds for seeing viral video will make you angry too pvp
First published on: 14-08-2022 at 12:52 IST