Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पोट धरून हसवणारे असतात तर काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. काही व्हिडीओ भावूक करणारे सुद्धा असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. या व्हिडीओमध्ये एक महिला आयुष्यात माहेर का महत्त्वाचे असते, याविषयी एका कार्यक्रमात सांगताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला सांगते, “माझं लग्न झाल्यानंतर एका वर्षातच माझ्या नवऱ्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. असं होतं की त्यांचं आयुष्य आता संपेल. पण माझी आई आहे. तिने माझ्या नवऱ्याला एक किडनी डोनेट केली. ती किडनी दान केल्यामुळे आज माझ्या संसाराला सोळा वर्षे झाली. माझा संसार जो फक्त माझ्या आईवडिलांमुळे आहे. माझी आजी तिला म्हणत होती की तु का देते? एकदा मुलगी दिली की ती लोकाचं धन. आता नको तू काय करू. आता तु तुझा तू संसार बघ पण माझी आई बोलली, “नाही माझी जबाबदारी संपत नाही तिथे माझी मुलगी दिली आहे ना तर मी जो पर्यंत आहे मी होईल तेवढा तिला सपोर्ट करेन.” जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा सर्व डॉक्टर्स आईला म्हणाले की तुम्ही खूप मोठं दान केलं आहे. मुलीचं दान करणे म्हणजे कन्यादान पण एक जीवनदान पण तू लगेच केलं.”
हा व्हिडीओ पाहून तुम्हाला रडू आवरणार नाही. भावूक करणारा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय,”म्हणून आयुष्यात माहेर हे महत्त्वाचे आहे.”
पाहा व्हायरल व्हिडीओ
हेही वाचा : VIDEO : प्रवाशांच्या जीवाशी खेळ! लालपरीची बिकट अवस्था पाहून एसटी महामंडळावर भडकले लोक, VIDEO एकदा पाहाच
marathi_wedding_katta‘ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सगळ्यांच्या नशिबात अशी माऊली नाही धन्य आहे तुमची माऊली त्यांना कोटी कोटी प्रणाम” तर एका युजरने लिहिलेय, “आई ही आईच असते. तिची जागा कोणीच घेत नाही. आपल्या मुलीच्या संसार व्हावा, यासाठी स्वतःची किडनी देणे हे कुणालाही जमत नाही. स्वतः त्या मुलाच्या आई-बाबाला पण जमलं नसतं, पण त्या आईने आपल्या मुलीसाठी केलं. धन्य ती आई.” तर एका युजरने लिहिलेय, “खुप नशीबवान आहेस ताई.तुझं माहेर खुप छान आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “सगळे दिले मला आयुष्याने, आता एकच देवाकडे मागणे, प्रत्येक जन्मी मला हिच आई मिळो, या पेक्षा अजून काय हवे..” एक युजर लिहितो, “आईची जागा नाही कोणी नाही घेऊ शकत.” तर एक युजर लिहितो, “शब्द नाही बोलायला.”