प्रवासात एखाद्या महिलेची प्रसूती झाल्याच्या अनेक घटना आपल्या कानावर आल्या आहेत. कधी बस तर कधी रेल्वेमध्ये महिलेची प्रसूती झाल्याचं आपण ऐकलं आहे. मात्र, एखाद्या महिलेची प्रसूती थेट विमानाच्या टॉयलेट मध्ये झाल्याचं तुम्ही ऐकलंय? नाही ना! मात्र, हे खरंय! केएलएम रॉयल डच एअरलाईनच्या विमानातून प्रवास करणाऱ्या या महिलेच्या पोटात दुखू लागलं.आश्चर्याची गोष्ट अशी की, ती गर्भवती आहे हे तिला माहित नव्हतं. त्यानंतर ती विमानाच्या टॉयलेटमध्ये गेली आणि तिनं एका बाळा जन्म दिला. ही घटना तिच्यासाठी आणि विमानकंपनीसाठी सरप्राईज डीलीव्हरी ठरली आहे.
‘ति’चा प्रवास होता आश्चर्यचकित करणारा!
नेदरलँड येथील ‘तमारा’ नावाची ही महिला प्रवासी गायुहक्वील-इक्वेडोर ते अॅमेस्टरडॅम प्रवास करीत होती. प्रवासादरम्यान तीच्या पोटात दुखू लागल्याने ती शौचालयात गेली. यावेळी या विमानात दोन डॉक्टर आणि नर्स उपस्थित होते. डॉक्टरांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी या महिलेची प्रसूती यशस्वीपणे पार पाडली. तिनं एका गोंडस बाळाला जन्म दिला. ती गर्भवती असल्याचं तिला माहित नव्हतं. त्यामुळं हा प्रकार तिच्यासाठी आणि विमानकंपनीसाठी आश्चर्यकारक ठरला.
(हे ही वाचा : YouTube वरील सेक्सी व्हिडीओ पाहून परीक्षेत झालोय नापास म्हणत, पठ्ठा पोहोचला कोर्टात, अन्’…’)
आई आणि बाळ दोघेही सुरक्षित
या महिलेला तातडीने पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. नेदरलँड येथील हॉस्पिटलमध्ये या बाळाचे नाव तिने ‘मॅक्सीमिलीआनो’ असे ठेवले आहे. आई आणि बाळ दोघांची प्रकृती सध्या चांगली आहे, असे केएलएम एअरलाइनने सांगितले. शिफोल येथे आल्यावर आई आणि नवजात मुलाला रुग्णवाहिकेद्वारे स्पार्न गस्थुईस येथे नेण्यात आले. शक्य तितक्या लवकर, तमारा आणि मॅक्सिमिलियानो माद्रिदला प्रयाण करतील. अशी माहिती आहे.
“तमारा आणि मॅक्सिमिलियानो दोघांचीही प्रकृती सुदैवाने चांगली होती,” असे हॉस्पिटलने सांगितले, आउटलेटनुसार. “दोघांनाही योग्य काळजी मिळावी आणि मॅक्सिमिलियानोसाठी आवश्यक कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी ते मार्गस्थ आहेत याची खात्री करण्यासाठी प्रसूती विभागातील टीमने शक्य ते सर्व प्रयत्न केले. शक्य तितक्या लवकर, तमारा आणि मॅक्सिमिलियानो माद्रिदला प्रयाण करतील.