scorecardresearch

या व्हायरल फोटोमध्ये दडलाय एक इंग्रजी शब्द; तुम्ही ओळखू शकता का?

व्हायरल होणाऱ्या या चित्रात एक चेहरा दिसत आहे. परंतु यामध्ये असे काही लिहलंय जे शोधता शोधता भल्याभल्यांना घाम फुटला आहे.

जर तुम्ही चित्र नीट बघितले तर तुम्हाला यात एक इंग्रजी शब्द लपलेला दिसेल. (Photo : Social Media)

सोशल मीडियावर अनेकदा अशा पोस्ट समोर येतात ज्या बघून आपले डोके चक्रावून जाते. खरंतर यामध्ये ऑप्टिकल इल्युजन असणारे चित्र शेअर केले जातात. या चित्रांमध्ये असे काहीतरी नक्कीच असते, ज्याद्वारे लोकांच्या तीक्ष्ण नजरांची चाचणी घेतली जाते.नुकतंच सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक नवे चॅलेंज आले आहे. व्हायरल होणाऱ्या या चित्रात एक चेहरा दिसत आहे. परंतु यामध्ये असे काही लिहलंय जे शोधता शोधता भल्याभल्यांना घाम फुटला आहे.

हा फोटो पहिल्यांदा पाहिल्यावर आपल्याला चष्मा घातलेल्या एका व्यक्तीचा चेहरा दिसेल. त्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा फक्त समोरचा भाग तुम्हाला दिसेल. या चित्रात नाक, तोंड, घसा आणि डोळ्यांवर चष्मा घातलेला दिसतो. पण या चित्रात आणखी काही दडलेले आहे. जर तुम्ही चित्र नीट बघितले तर तुम्हाला यात एक इंग्रजी शब्द लपलेला दिसेल.

आहेर द्यायला आलेल्या व्यक्तीने नवरदेवासोबत केले असे काही; नववधूसह पाहुण्यांनाही बसला धक्का

हे चित्र डावीकडून पाहिल्यास ‘Liar’ हा इंग्रजी शब्द आपल्याला वाचायला मिळेल. या व्यक्तीचे नाक ‘एल’ अक्षराप्रमाणे तयार केले असून नाकाचा होल आणि खालील काही भाग मिळून ‘आय’ अक्षर तयार झाले आहे. तसेच दोन्ही ओठ मिळून ‘ए’ हे अक्षर तयार होते. शेवटी, हनुवटीपासून मानेपर्यंतचा भाग ‘आर’ सारखा दिसतो. हे चित्र दिसायला जितकं साधारण दिसत आहे. तितकी याची रचना साधारण नाही.

ही ऑप्टिकल इल्युजन पोस्ट सोशल मीडियावर शेअर होताच लोकांनीही वेगाने प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली. हे छायाचित्र पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, या चित्रात असा शब्द लपला असेल, असे मला वाटलेही नव्हते. त्याचवेळी आणखी एका यूजरने सांगितले की, प्रत्यक्षात हे चित्र कोणाच्याही डोळ्यांना फसवू शकते. अनेकांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरूनही हा फोटो शेअर केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A word hidden in this viral photo can you recognize pvp

ताज्या बातम्या