Premium

तरुणाची गौतमी पाटीलला टक्कर! लावणीवर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

या व्हायरल व्हिडीओमध्ये हा तरुण एका लावणी गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. त्याचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

dance video goes viral
तरुणाची गौतमी पाटीलला टक्कर! लावणीवर केला भन्नाट डान्स (Photo : Instagram)

Viral Video : सध्या महाराष्ट्रात ‘डान्स’ हा शब्द जरी उच्चारला तरी गौतमी पाटीलचे नाव समोर येते. तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या गौतमी पाटीलची क्रेझ दिवसागणिक वाढताना दिसत आहे. सोशल मीडियावर तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात पण सध्या गौतमी पाटीलला टक्कर देणाऱ्या एका तरुणाचा डान्स व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये हा तरुण एका लावणीवर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. त्याचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हायरल व्हिडीओ एका सार्वजानिक कार्यक्रमातील आहे. व्हिडीओत लहानांपासून वृद्धापर्यंत सर्व खाली बसलेले दिसत आहे आणि हा तरुण सर्वांसमोर डान्स करताना दिसत असेल. “तुम्हा बघुन तोल माझा गेला” या लावणीवर तरुण सुंदर डान्स करताना दिसत आहे. तरुणाच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. गौतमी पाटीलला टक्कर देणारा डान्स या तरुणाने केला आहे. त्याचा डान्स पाहून लोकं सुद्धा टाळ्या वाजवून त्याचा उत्साह वाढवताना दिसत आहे.

हेही वाचा : Jugaad Video : पाकिस्तानची उतरती कळा सुरु; इंधनाच्या दरात पुन्हा वाढ, तरुणांनी तयार केली पेट्रोल शिवाय चालणारी ही ‘जुगाडू गाडी’

sushilpatil941_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलेय, “गौतमी ताईला टक्कर”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “एखादी कला हुबेहुब आत्मसात करणं फार अवघड आहे” तर एका युजरने लिहिलेय, “मुलांमध्ये खूप टॅलेंट असतं पण ते दाखवत नाही… खूप छान भावा” आणखी एका युजरने लिहिलेय, “नादच खुळा रे भावा”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A young boy dance on marathi lavani song tumha baghun tol maza gela bumped into gautami patil dance video goes viral instagram social media ndj

First published on: 02-10-2023 at 09:54 IST
Next Story
पती, पैसा अन् मर्डर…पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट; कॉफीमध्ये मिसळले ‘ब्लीच’, घटनेचा VIDEO आला समोर