Viral Video : लावणी ही महाराष्ट्रीयन नृत्य म्हणून ओळखली जाते. लावणी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. सोशल मीडियावर लावणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सहसा लावणी ही महिलांकडून सादर केली जायची पण कालांतराने पुरुषांनी सुद्धा आवडीने लावणी सादर करायला सुरुवात केली. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण सुंदर लावणी सादर करताना दिसत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे.व्हिडीओ तुम्हाला दिसेल की लावणीच्या ठेक्यावर हा तरुण सुंदर स्टेप्स करताना दिसत आहे. त्याच्या लावणीच्या स्टेप्सवर त्याच्या आजुबाजूला उभे असलेले तरुण मंडळी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून त्याला प्रोत्साहन देताना दिसत आहे. तरुणाची लावणी पाहून तुम्ही गौतमी पाटीलसुद्धा विसराल. गौतमी ही लोकप्रिय डान्सर आहे पण या तरुणाने तिला सुद्धा मागे टाकले. सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे.
हेही वाचा : VIDEO : याला म्हणतात प्रेम! पराभवानंतर अनुष्काने विराटला मारली मिठी, व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावूक
princebaji12 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पार्टी सेलिब्रेशन”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “कुठे आहे गौतमी… ये म्हणावं तिला, मी माझा वाघ आणलाय” तर एका युजरने लिहिलेय, “तोड नाही तुला, एक नंबर..” आणखी एका युजरने लिहिलेय, “नादखूळा” अनेक युजर्सनी या तरुणाची तुलना गौतमी पाटीलबरोबर केली आहे” झकास लावणी पाहून अनेक युजर्सनी तरुणावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.”