Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक नवनवीन गोष्टी व्हायरल होत असतात. कधी गाणी तर कधी डान्स चर्चेत येतो. कधी कोणाची रील तर कधी कोणाचा हटके लूक व्हायरल होतो. काही महिन्यांपूर्वी “अतिशय युनिक, अतिशय वेगळा असा आळस मला आलेलाय” हे एक गाणं व्हायरल झालं होतं. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी हे गाणं ऐकलं असेल. अनेकांनी या गाण्यावर रिल्स सुद्धा बनवल्या होत्या. आता या गाण्याची चाल धरून एक हटके गाणं तयार केले आहे. हे गाणं पावसावर आधारीत आहे. तुम्ही हे गाणं ऐकलं का? (a young girl sings a creative version of famous song atishay unique)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक मुलगी दिसेल. ती रस्त्यावर साचलेल्या पावसात उभी आहे आणि गाणं म्हणताना दिसते. ती म्हणते, “अतिशय युनिक, अतिशय वेगळं असं गटार आम्ही बांधलेलं आहे,
त्यामुळे रस्त्यात पाणी जमू दे
डास कीटक वाढतायंत तर वाढू दे
लोक डेंगी तापाने पडतायंत तर पडू दे
डॉक्टरांची पायरी चढतायंत तर चढू दे
पडू देत, पडणारी लोकबिकं गाड्यांची चाकंबिकं तुटू देत
गॅरेजमध्ये सडू देत”

A mechanism has been created by the ST administration to complain to the depot head about any problem in the journey of the ST Mumbai news
एसटी प्रवासात अडचण आल्यास थेट आगार प्रमुखांना फोन करा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
article about sahyadri sankalp society information
सर्वकार्येषु सर्वदा : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याचा ‘संकल्प’
Electricity system Maharashtra, strike employees,
राज्यातील वीज यंत्रणा कोलमडणार! कर्मचाऱ्यांनी पुन्हा उगारले संपाचे अस्त्र
Success Story An inspiring journey from selling balloons
Success Story: रस्त्यांवर फुगे विकण्यापासून ते करोडोंची कंपनी उभी करण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
bhopal Theft, flats, mp news,
धूम-२ चित्रपटाची नक्कल करून १५ कोटींचे सोने चोरण्याचा प्रयत्न; पण खिडकीतून उडी मारताना पडला अन्…
Bank employee stabbed to death in pune
धक्कादायक : किरकोळ वादातून बँक कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करून खून, हडपसर भागातील घटना; तीन अल्पवयीनांसह चौघे ताब्यात
order of CIDCO Deputy Registrar to submit Building Hazardous Certificate navi Mumbai
पुनर्विकासातील घोळांना चाप; इमारत धोकादायक प्रमाणपत्र सादर करण्याचे उपनिबंधकांचे आदेश

त्यानंतर एका पुरुषाचा आवाज येतो, “इतकं चांगलं गटार बरं नव्हे!”

हेही वाचा : Fire at petrol pump Viral Video: महिलेच्या धाडसाला सलाम! पेट्रोल पंपावर बाईक पेटली अन्…, अवघ्या १२ सेकंदात घडलं ‘असं’ काही

त्यानंतर मुलगी म्हणते,
“आता जरा पाऊस इकडे वाढलेलाय,
आई, मला माझा रेनकोट दे!”

त्यानंतर पुन्हा पुरुषाचा आवाज येतो,
“आणि पुढच्या वेळेस इतकं चांगलं गटार बांधलं ना तर इकडे पोहायची स्पर्धा भरवेन.”

त्यानंतर ती मुलगी म्हणते,
“काय? पाणी खूप खोल आहे इकडे…”

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : किली पॉलचा ‘गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा’ गाण्यावर हटके डान्स अन् जबरदस्त एक्स्प्रेशन्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

sunil_d_mello या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “अतिशय युनिक असं गाणं ! सध्याच्या काळात ज्या प्रकारे महापालिका / नगरपालिकांमध्ये गटार बांधकामे होतात, त्यावर खोचक टीका केलीय !” तर एका युजरने लिहिलेय, “अतिशय यूनिक विषय मांडलेला आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “विषय देखील खोल आहे” एक युजर लिहितो, “गटारात प्लास्टिक टाकताय तर टाकु दे, गटार तुंबतय तर तुंबु दे” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहेत.