Viral Video : पाट्या हा शब्द कानावर पडला की पुणेरी पाट्यांची आठवण येते पण हल्ली पुणेरी पाट्यांबरोबर एका वेगळ्या पद्धतीच्या पाट्या सुद्धा चर्चेत येतात. तुम्ही कधी हातात पाटी घेऊन रस्त्याच्या शेजारी उभे असलेले तरुण पाहिले आहे का? त्या पाट्यांवर ते कधी मजेशीर तर कधी प्रेरणादायी मेसेज लिहितात आणि येणारे जाणारे त्यांचा मेसेज वाचून ज्या प्रतिक्रिया देतात, त्या प्रतिक्रिया हे लोक कॅमेऱ्यामध्ये कैद करतात. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण हातात पाटी घेऊन उभा आहे. त्या पाटीवर त्याने असा भन्नाट मेसेज लिहिला आहे की येणारे जाणारे लोक त्याच्या मेसेजवर सहमती दर्शवत आहे. त्याने पाटीवर नेमके काय लिहिले, जाणून घेऊ या.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की रस्त्यावर येणारे जाणारे लोक एका तरुणाने हातात धरलेल्या पाटीकडे बघत आहे. या तरुणाने पाटीवर लिहिलेल्या मेसेजवर सहमती दर्शवत आहे. एक महिला जाताना म्हणते, “एकदम बरोबर” तर एक व्यक्ती त्याच्या मुलाकडे बोट दाखवत म्हणते, “हा मेसेज खरा आहे याच्यासाठी” काही लोक मेसेज वाचून पोट धरून हसताना दिसत आहे तर काही लोक फोटो आणि व्हिडीओ काढत आहे. एक महिला म्हणते, “मुलं ऐकत नाही ना.. काढ बाई एक फोटो मग मुलं ऐकतील तर आमचं” एक महिला म्हणते, “एवढा आवाज येतो दादा, आमची आजीबाई तर घाबरून जाते” अनेक लोक हा मेसेज शंभर टक्के खरा असल्याचे म्हणतात.
u
u
काय लिहिलेय पाटीवर?
पुढे या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला तरुणाने पाटीवर नेमके काय लिहिले, हे दिसेल. पाटीवर लिहिलेय, “दिवाळीत फटाके तेवढेच उडवा जेवढे नंतर आयुष्यात दिवे लावू शकाल.” व्हिडीओवर लिहिलेय, “आयुष्याची दिवाळी”
पाहा व्हायरल व्हिडीओ
_sahil_0919 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ठरवा मग काय ते..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तू तुझ्या आयुष्यात किती दिवे लावले?”
u
एका युजरने लिहिलेय, “जास्त फटाके वाजवले म्हणजे दिवाळी चांगली झाली का ? हातात धरून सुतळी बॉम्ब हवेत भिरकावने , हातात बाण धरून सोडणे मग तो कोणाच्या घरात का जाईना? हा अतिरेकीपणा नाही का ? असे करून दिवाळी मध्ये धन्वंतरी, गणेश, लक्ष्मी कुबेर जी प्रसन्न होतील का? जास्त फटाके म्हणजे चांगली दिवाळी का ? जास्त फटाके म्हणजे काही धनाढ्य तर काही राजकीय पार्श्वभमी असलेले फोडतात त्यांना बघून सामान्य घरातील लहान मुले अनुकरण करायला बघतात मग पोस्टर मध्ये काय चुकीचे आहे. बेल शंकराला, गणपतीला मोदक, देवीला ओटी, तसे फटाके कोणत्या देवाला प्रिय आहे ?” आणखी एका युजरने लिहिलेय, “एक नंबर भावा, खूप सुंदर मेसेज दिला आहे आताच्या पिढीला.”