Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो. कधी कोणी स्टंट करताना दिसतो तर कधी कोणी जुगाड दाखवताना दिसतो. हल्ली सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड दिसत आहे. हातात पाटी घेऊन लोक रस्त्यावर उभे राहतात आणि त्या पाटीवर कधी मजेशीर तर कधी प्रेरणादायी संदेश लिहितात. तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हातात पाटी घेऊन उभा आहे आणि त्या व्यक्तीने त्या पाटीवर वडीलांवर आधारीत सुंदर संदेश लिहिला आहे. हा संदेश वाचून तुम्हीही भावुक व्हाल. (Emotional message for fathers sacrifice heart touching video goes viral)

“डोळ्यातले अश्रु डोळ्यांतच जिरवण्याची ताकद फक्त ‘बापाकडे’ असते”

हा व्हायरल व्हिडीओ एका सार्वजानिक कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हातात पाटी घेऊन उभा दिसत आहे. या पाटीने सर्वांचे लक्ष वेधले आहे कारण या पाटीवर सुंदर संदेश लिहिला आहे. या पाटीवर लिहिलेय, “डोळ्यातले अश्रु डोळ्यांतच जिरवण्याची ताकद फक्त “बापाकडे” असते” हे वाक्य वाचून कोणीही भावुक होईल. काही लोकांना ही पाटी पाहून वडिलांची आठवण येईल.
याच व्हिडीओमध्ये पुढे हीच व्यक्ती आणखी एक पाटी घेऊन उभी दिसतात. त्या पाटीवर लिहिलेय, “पगार झाला की बघु य वाक्यातच कितीतरी स्वप्न ताटकळत उभी असतात.” कर्मचारी वर्गासाठी हा संदेश लिहिला आहे. नोकरी करणाऱ्यांना या पाटीवरील संदेशामागील दु:ख कळेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा : आई-वडिलांची नाही तर ‘या’ गोष्टीची कृपा म्हणत पठ्ठ्यानं घराला दिलं भन्नाट नाव; PHOTO एकदा पाहाच

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : “दिलात झापुक झूपूक वाजत राहतय ग” महिलांनी केला जबरदस्त डान्स, VIDEO एकदा पाहाच

nageshkuklare_5505 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हे फक्त “बापच” करू शकतो…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आई देवीच्या दरबारात….एक बाप माणसाची भावना” तर एका युजरने लिहिलेय, “खरं आहे भावा, डोळे भरून आले” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader