Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येते तर काही व्हिडीओ पाहून दु:ख होते. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. या व्हिडीओमध्ये एक तरुण भररस्त्यावर एका मुलीला प्रपोज करतो पण पुढे असे काही होते की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या मुलाबरोबर नेमके काय घडले? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ नीट पाहावा लागेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण भररस्त्यावर एका मुलीसमोर गुडघे टेकवून तिला प्रपोज करतो.त्याच्या हातात अंगठीचा बॉक्स असतो पण मुलगी काहीच प्रतिक्रिया देत नाही आणि तेथून धावत पळत जाते. मुलीला पळताना पाहून तरुणाला कळते की तिचे उत्तर नाही तेव्हा तो खाली बसतो आणि ढसा ढसा रडतो. ही घटना पाहून कोणीही भावूक होईल. तिथे आजुबाजूला उभे असलेले व बसलेले लोक त्या तरुणाजवळ येतात आणि त्याला धीर देतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला या तरुणाबरोबर जे घडले, त्याविषयी दु:ख वाटेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हेही वाचा : लोणावळ्यासारखी दुर्घटना तुमच्याबरोबर घडली तर काय कराल? पुरात अडकल्यास फक्त ‘ही’ एक कृती मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढेल, पाहा VIDEO पाहा व्हायरल व्हिडीओ हेही वाचा : प्रवाशांच्या जीवाशी खेळ! ओव्हरटेकिंग करण्याचा नादात तीन बसचा झाला असता मोठा अपघात; पाहा थरारक Video Viral ravneetsinghmusic या इन्स्टाग्राम अकाउंटवरून गायक रनवीत सिंह यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, "काय कारण असू शकते?" या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, "काय माहीत मुलीला दुसऱ्या मुलावर प्रेम असेल" तर एका युजरने लिहिलेय, "एक कारण म्हणजे कुटुंब ऐकणार नाही. " आणखी एका युजरने लिहिलेय, "कदाचित मुलगा कमावत नसेल" एक युजर लिहितो, "कदाचित मुलगी त्याला भावाप्रमाणे समजत असावी पण त्याला तिचा बॉयफ्रेंड बनायचे असेल." कमेंट्मध्ये अनेक युजर्सनी मुलीने नकार दिल्याचे अनेक कारणे सांगितले आहेत. काही युजर्सनी त्या तरुणाविषयी सहानुभूती व्यक्त केली आहे.