Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी जुगाड दाखवताना दिसतो. कधी कोणी सुंदर आवाजात गाणी म्हणताना दिसतो तर कधी कोणी भयानक स्टंट करताना दिसतो. अनेकदा काही लोक त्यांच्या आजुबाजूला घडणाऱ्या गमती जमती किंवा भयानक घटना कॅमेऱ्यामध्ये कैद करतात. असे असेन व्हिडीओ दर दिवशी सोशल मीडियावर समोर येतात.

हल्ली एक नवीव ट्रेंड आला आहे. एखादा तरुण हातात पाटी घेऊन भर रस्त्यावर उभा राहतो आणि त्या पाटीवर कधी मजेशीर तर कधी भावनिक मेसेज लिहिलेला असतो. रस्त्यावरून येणारे जाणारे लोक त्या मेसेज कडे बघून प्रतिक्रिया देतात आणि त्यांच्या प्रतिक्रिया कॅमेऱ्यामध्ये कैद केले जातात. तुम्ही असे अनेक व्हिडीओ आजवर पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुद्धा एक तरुण हातात पाटी घेऊन उभा आहे आणि त्याने आई वडीलांवर आधारीत सुंदर मेसेज त्याच्या पाटीवर लिहिला आहे.

raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”
govinda wife sunita reveals actor hit two girls in college
“एका मुलीच्या तोंडावर गरम दूध फेकलं, तर दुसरीला…”, १८ व्या वर्षी सुनीताने केलेलं गोविंदाशी लग्न, ‘त्या’ प्रसंगानंतर झालेली पहिली भेट
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video

तरुणाने सांगितली खरी दुनियादारी

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल. हा तरुण हातात पाटी घेऊन भर रस्त्यात उभा आहे. त्याने पाटीवर आईवडीलांवर आधारीत हिंदीमध्ये एक मेसेज लिहिला आहे. पाटीवर लिहिलेय, “जहाँ सब साथ छोड देते है वहाँ माँ बाप ही अपना हाथ देते है” (जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा आईवडीलच हात देतात) हा मेसेज वाचून तुम्हीही भावुक व्हाल. रस्त्यावरील लोक हा मेसेज वाचून सहमती दर्शवत आहे. अनेक जण या तरुणाचे पोस्टरसह फोटो आणि व्हिडीओ काढताना दिसत आहे.

हेही वाचा : VIDEO: एक चूक जीवावर बेतली! गाडीला आग लागताच लोक विझवायला गेले; पण पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून उडेल थरकाप

व्हायरल व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.instagram.com/reel/DBJJsp4szzR/?igsh=MWp3a2hsZnpzeXBuaw%3D%3D

हेही वाचा : हे फक्त आईच करू शकते! चिमुकली रस्त्यावर पळत सुटली अन्…, पुढच्याच क्षणी आईने जे केलं ते पाहून मातृत्वाला कराल सलाम

ashish_raipat या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आई तुला खूप प्रेम” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “त्यांच्यापेक्षा मोठे कोणीही नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “खरं बोललास भावा” आणखी एका युजरने लिहिलेय, ” या जगात कोणीही कोणाचे नाही होत भावा. ना मित्र, ना प्रेम, कोणीही साथ देत नाही. सर्व एक दिवस सोडून जातात पण आपले कुटुंब नेहमी आपल्याबरोबर राहते.” एक युजर लिहितो, “आई वडीलांची जागा आपल्या आयुष्यातून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader