VIDEO : मेट्रोतील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पोट धरुन हसायला येते. मेट्रोमध्ये दरदिवशी हजारो लोकं प्रवास करतात. त्यामुळे गर्दी असणे साहजिक आहे. या गर्दीत काही लोकांना बसायला सीट मिळतात तर काही लोकांना उभ्याने प्रवास करावा लागतो.
असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सीट मिळवण्यासाठी तरुणाने अनोखा जुगाड केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही पोट धरुन हसायला येईल.
हा व्हायरल व्हिडीओ मेट्रोच्या एका डब्यातील आहे. या डब्यामध्ये गर्दी दिसून येत असून काही प्रवासी उभे आहेत तर काही प्रवासी सीटवर बसलेले आहेत. अशातच उभ्या असलेल्यापैकी एका तरुणाने असं काही केलं की कुणालाही न विचारता त्याला सीट मिळाली.
हो, हे खरंय. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हा तरुण सीट न मिळाल्यामुळे उभ्याने प्रवास करत आहे आणि त्याच्या समोर असलेल्या सीटवर ४-५ महिला बसलेल्या आहेत. अचानक तो थरथर कापायला लागतो. त्याला असं अचानक थरथर कापताना पाहून समोर बसलेल्या महिला घाबरुन जागेवरुन उठतात आणि त्याला बसायला सीट देतात. सीटवर बसल्यानंतरही हा तरुण एकदा थरथर कापण्याची नक्कल करतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही पोट धरुन हसायला येऊ शकते.




हेही वाचा : Desi Jugaad : तुम्ही घरी नसताना झाडांना पाणी कोण घालणार? टेन्शन घेऊ नका, हा भन्नाट जुगाड पाहा…
single.stud या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मेट्रोमध्ये सीट मिळवण्यासाठी जुगाड”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.