A young man enters in metro wearing a towel after that he did something that made the girls hide their faces watch viral video gps 97 | Loksatta

Video: टॉवेल गुंडाळून ‘तो’ थेट मेट्रोत शिरला; आत जाताच असं काही केलं की मुलींनी तोंडच लपवली

मेट्रोत टॉवेल गुंडाळून जाणाऱ्या व्यक्तीने असं काय केलं की मुलींना तोंड लपवण्याची वेळ आली. पाहा व्हिडिओ

Video: टॉवेल गुंडाळून ‘तो’ थेट मेट्रोत शिरला; आत जाताच असं काही केलं की मुलींनी तोंडच लपवली
photo(social media)

Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा यापैकी व्हिडिओ इतके मजेदार असतात जे पाहून हसू आवरत नाहीत. तर काही व्हिडिओ असेही असतात जे पाहून आश्चर्याचा धक्काच बसतो. सध्या एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओत एक तरुण चक्क टॉवेल गुंडाळून मेट्रोत प्रवेश करतो. टॉवेल गुंडाळून मेट्रोत आलेल्या तरुणाला पाहून प्रवाशांना हसू आवरत येत नाहीये.

मेट्रोत टॉवेल गुंडाळून फिरत असलेल्या तरुणाचा हा व्हिडिओ मेट्रोतील एका प्रवाशाने शूट केला. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, मेट्रोत अनेक प्रवाशी प्रवास करताना दिसत आहेत. त्याचवेळी एक तरुण टॉवेल गुंडाळून मेट्रोत प्रवेश करतो. या तरुणाला टॉवेल गुंडाळून आलेला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. मेट्रोतील सर्व प्रवाशी या तरुणाकडे आश्चर्याने पाहू लागतात. टॉवेल गुंडाळून मेट्रोत शिरलेला हा तरुण सर्वत्र फिरु लागतो आणि मेट्रोतील काचेत पाहून आपले केस विंसरू लागतो. ज्या पद्धतीने हा तरुण मेट्रोत फिरत होता ते पाहून तरुणींनी देखील आपली तोंड लपवली.

( हे ही वाचा: भंगारात गेलेल्या स्कुटरची अनोखी कमाल! देसी जुगाड पाहून आनंद महिंद्रा म्हणाले ” मला…”)

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: Video: लग्नात बुरखा घातलेल्या ‘ती’ ने सर्वांसमोर नवरदेवाला जवळ खेचंल; त्यानंतर त्याने महिलेचा चेहरा पाहिला अन…)

हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील नक्कीच हसायला येईल. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ‘mohitgauhar’ नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिला आहे. तर अनेक युजर्सनी या व्हिडिओला लाईक देखील केलं आहे. तसंच अनेकजण या व्हिडिओवर कमेंट्स करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 18:16 IST
Next Story
निमित्त ट्रकमधील डिझेल संपल्याचं, कमाई ८ कोटींची; जाणून घ्या क्षणात करोडपती बनलेल्या महिलेची कहाणी