Train Accident Viral Video: मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करीत असतात. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ठिकठिकाणाहून लोक मुंबईत येतात आणि मुंबईचेच होऊन जातात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी लोकलमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. दररोज सकाळी कामावर जाणाऱ्यांची लगबग आणि धक्काबुक्की करत ‘अंदर बहुत जगा है’, असं म्हणत मुंबई लोकलमध्ये प्रवेश मिळविणाऱ्या असंख्य माणसांची दर दिवशी गर्दी पाहायला मिळते.
यात अनेक जण मुंबईत पहिल्यांदाच आलेले असतात आणि त्यांना ट्रेनमधून नेमकं कसं उतरायचं तेच कळत नाही. अशात ज्यांना चालत्या ट्रेनमधून कसं उतरायचं हेच माहीत नसतं आणि दुसऱ्यांना बघून स्वत:पण असलं काहीतरी करायला जातात आणि स्वत:वर संकट ओढवून घेतात. सध्या अशाच माणसाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक तरुण चालत्या ट्रेनमधून उतरताना दिसतोय. पण, या नादात त्याचा तोल जातो आणि तो खालीच पडतो.
हेही वाचा… परिस्थिती सगळं काही शिकवते! डिलिव्हरी बॉयचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये ट्रेन आपल्या वेगाने धावताना दिसतेय. अशातच स्टेशन जवळ येताच चालत्या ट्रेनमधून एक माणूस घाईघाईत उलट्या दिशेने उतरताना दिसतोय. पण, या नादात तो मोठं संकट ओढवून घेतो. ट्रेनमधून उतरताना या माणसाने आधी चप्पल खाली फेकतो. मग उतरता त्याचा तोल जातो आणि ट्रेन आणि फलाटामधील जागेत तो अडकून राहतो. या परिस्थितीत आजूबाजूची माणसं त्याची मदत करण्यासाठी लगेच धाव घेतात आणि त्याला तिथून बाहेर काढतात. फलाटावर सुखरूप आल्यानंतर अनेक जण त्याला समजावत असतात.
हा व्हायरल व्हिडीओ @suraj_patel_jj या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “मरता मरता वाचला भाऊ” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे; तर तब्बल ३६.८ मिलियन व्ह्यूज या व्हिडीओला आले आहेत. ही घटना सुरत रेल्वेस्थानकावर घडल्याचं बोललं जातंय.
हेही वाचा… धक्कादायक! पिसाळलेल्या बैलाचा आजोबांवर हल्ला; टोकदार शिंगांनी उडवलं अन्…, थरारक घटनेचा VIDEO VIRAL
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “उलट्या दिशेने उतरणार तर असंच होणार.” तर दुसऱ्याने “बरं झालं, वाचला बिचारा” अशी कमेंट केली. “या ट्रेनमध्ये मीपण होते, तो माणूस गुवाहाटीवरून आलेला”, अशी कमेंट एका युजरने केली. “सॉरी आप मुंबई नही आ सकते”, अशी कमेंटदेखील एकाने केली.