Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लग्नातील डान्स तर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने लग्नाच्या एका कार्यक्रमात दमलेल्या बापाची कहाणी सादर केली. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. काही लोकांना त्यांच्या वडिलांची आठवण येईल तर काही लोकांना अश्रु आवरणार नाही.

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नाच्या कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. तो “दमलेल्या बाबाची कहाणी’या वडिलांवर आधारित गाण्यावर डान्स सादर करताना दिसतोय. तो ज्या प्रकारे दमलेल्या बापाची गोष्ट सांगतो ते पाहून तुम्हीही भावूक व्हाल. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे, तो सुरूवातीला स्टेजवर डान्स करताना दिसतो त्यानंतर तो त्याच्या पुढे बसलेल्या वडिलाकडे हात दाखवून दमलेल्या बापाची गोष्ट सांगतो. त्यानंतर तो स्टेजवरून खाली उतरतो आणि समोर बसलेल्या वडिलाला आणि नवरीमुलीला समोर आणतो. वडिल आणि नवरी मुलगी रडताना दिसतात. त्यानंतर संपूर्ण कुटूंब समोर येतं आणि त्यांना अश्रु आवरत नाही. प्रत्येक जण व्हिडीओमध्ये रडताना दिसतात.

हेही वाचा : तीन शुभ राजयोग बनल्याने तीन राशी होतील मालामाल, मिळणार गडगंज पैसा; वाचा, ज्योतिषशास्त्र काय सांगते…

sidbobadi21 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दमलेल्या बापाची कहाणी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून मला माझ्या बाबाची आठवण आली” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान दादा.. सर्व लेखन आईवरच होते पण पडद्या आड रडणारा बाप कोणी दाखवत नाही..” आणखी एका युजरने लिहिलेय, “डोळ्यात पाणी आलं दादा. काळजाला लागला तुझा व्हिडीओ. खूप छान.. आईबाबा आठवले लगेच..” व्हिडीओ पाहून अनेक युजर्स भावूक झाले. काही लोकांना त्यांच्या वडिलांची आठवण आली. अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.