Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात.अनेकदा काही जुने व्हिडीओ पुन्हा व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला या पार्श्वभुमीवर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अशाच एक रॅप सुद्धा पुन्हा व्हायरल होत आहे. काही लोकांना हा रॅप कदाचित ऐकला असेल तर काही लोक पहिल्यांदा ऐकतील. या रॅपमध्ये ‘सत्तेचे भुकेले’ म्हणत नेत्यांना खडे बोल सुनावले आहे. हा रॅप ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. महाराष्ट्राची खरी राजकीय परिस्थिती दाखवणारा हा रॅप आहे.

लोकप्रिय रॅपबॉसने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो वेगवेगळे लोकेशन दाखवत अत्यंत तालासुरात रॅप म्हणताना दिसत आहे. रॅप खालील प्रमाणे –
सत्तेचे भुकेले उपाशी हे सारे
म्हणतात हे स्वत:ला जनतेचे नोकरं..
फिरायला यांना एसीची गाडी अन् राहायला यांना हॉटेल फाकडं..
कसा चा जनादेश कसाचं काय..
अरे निवडुन दिले ते सत्तेत नाय..
यांचे नेते गेले त्यांच्या पक्षात अन् प्रत्ये पक्ष फुटलेला हाय
दुर्भाग्य माझ्या महाराष्ट्राचं माझ्या राज्याला विरोधी पक्षच नायं..
कोण इथं साफ अन् दुधाने धुतलेला
प्रत्येक नेता चिखलात माखलेला..
खरं बोलणाऱ्याला इडीची धाड
लोकसत्तेच्या नावानं हुकूमशाही
अन् तोंड दाबुन वर बुक्याचा मार
जनता बिचारी.. महागाईत बेजार आहे
कसा कष्ट भरा टॅक्स
जय महाराष्ट्र..
सत्तेचे भुकेले पर्वा नाही जनतेची सत्तेचे भुकेले..
नेत्यांच्या नावाने भरतेय चोरांचे.. सत्तेचे भुकेले..

Supriya Sule, reservation, satara,
राज्यकर्ते आरक्षणाच्या प्रश्नांवर गंभीर नाहीत – खासदार सुप्रिया सुळे
Maharashtra Monsoon Session 2024 , Maharashtra, assembly election, monsoon session, Fourteenth Legislative Assembly, MLAs, starred questions, professor recruitment, women and child welfare, public health, environmental issues, farmers, legislative proceedings, supplementary demands, budget, fiscal deficit, governance,
आपल्या आमदारांनी या अधिवेशनात काय काम केलं?
Death fast of Muslim community victimized in Pusesawali riots
पुसेसावळी दंगलीतील पिडीत मुस्लिम समाजाचे दि.८ पासून आमरण उपोषण
Raj Thackeray
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याची बातमी केव्हा मिळणार?” अमेरिकेत विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरेंचं मिश्किल उत्तर; म्हणाले, “मॅटर्निटी होम…”
jayant patil on maharashtra budget
“चादर लगी फटने, खैरात लगी बटने”; अर्थसंकल्पावरून जयंत पाटलांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “अत्यंत बेजाबदार…”
Deputy Chief Minister Devendra Fadnavis and former Chief Minister Uddhav Thackeray at the same time in the lift of Vidhan Bhavan
लिफ्टमधील भेट, चॉकलेटपेढे अन् महाराष्ट्राची परंपरा!
Ajit pawar and devendra fadnavis (1)
“…तर आम्हाला विधानसभा निवडणूक वेगळी लढवावी लागेल”, अजित पवार गटातील आमदाराचा महायुतीला इशारा; म्हणाले…
survey of muslim community stalled
मुस्लीम समाजाचे सर्वेक्षण रखडले, अधिवेशनात मुद्दा पेटण्याची चिन्हे

हेही वाचा : चिलीम-तंबाखू,शिरा-पुरी की खांब-खांब, तुम्ही या खेळाला काय म्हणायचा? Viral Video पाहून बालपणीच्या आठवणी होतील जाग्या

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : “४० वर्षे झाली आमची युती आहे, जमत अजिबात नाही..” आजोबांनी थेट बायकोसमोरच सांगितले, पाहा VIDEO

rapboss8055 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सत्तेचे भुकेले – मराठी रॅप” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भाई तुझा विषयच हार्ड आहे” तर एका युजरने लिहिलेय, “एक नंबर भावा, सर्वांना हात जोडून विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तरुण पिढीचे डोळे उघडतील” आणखी एका युजरने लिहिलेय, “सत्य परिस्थिती आहे महाराष्ट्रातील…” एक युजर लिहितो, ” भावा खरं बोललास”

काही महिन्यांपूर्वी हा तरुण “काय सांगू राणी मला गाव सुटना” या लोकप्रिय गाण्याचं रॅप व्हर्जन म्हणताना दिसला होता. त्याचा हा व्हिडीओ त्यावेळी चांगलाच व्हायरल झाला होता.