scorecardresearch

Video: पुजेदरम्यान घंटी सापडली नाही म्हणून तरुणाने केला भलता जुगाड, नेटकरी म्हणाले “अरे देवाला तरी…”

तरुणाच्या भन्नाट युक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

funny viral video
सध्याचा जमाना हा डिजीटल तंत्रज्ञानाचा आहे, त्यामुळे अनेक लोक तंत्रज्ञानाचा वापर करत आपली काम सोपी करत असतात. (Photo : Twitter)

सध्याचा जमाना हा डिजीटल तंत्रज्ञानाचा आहे, त्यामुळे अनेक लोक बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करत आपली काम सोपी करत असतात. शिवाय मोबाईल म्हणजे तर जीवनातील एक अविभाज्य भागच झाला आहे. लोकांना मोबाईलशिवाय राहणं कठिण झालं आहे. कारण मोबाईलद्वारे आपली अनेक काम होतात. पण सध्या एका तरुणाने आपल्या मोबाईलचा वापर अशा गोष्टीसाठी केला आहे. जे पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठिण झालं आहे.

@byomkesbakshy नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडीओमध्ये एक तरुण घरामध्ये देवाची पूजा करत असल्याचं दिसत आहे. पूजा करताना आपल्याजवळ घंटी नसल्याचं समजताच त्याने असं काही केलं, जे पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. शिवाय या तरुणाला तंत्रज्ञानाचा खरा वापर कसा करायचा हे समजलं असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. तर हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “तंत्रज्ञानाचा अप्रतिम वापर!!”

हेही पाहा- दुधाची किटली आणि ट्रॅक्टरच्या सायलेन्सरचा वापर करुन ‘या’ पठ्ठ्याने बनवली अनोखी बाईक; पाहा Viral Video

व्हिडीओत एक तरुण जमिनीवर बसून पूजा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर हा तरुण पूजा करत असताना ज्यावेळी घंटी वाजवण्याची वेळ येते त्यावेळी घंटी सापडत नाही. त्यामुळे तो लगेच शेजारी असलेला आपला मोबाईल घेतो आणि मोबाईलमधील बेल अॅप उघडून त्यामधी घंटानाद चालू करतो. त्यामुळे घंटा वाजत वाजत राहेते आणि तो तरुण आपली पूजा पार पाडतो.

हेही पाहा- Video: ढोल-ताशांचा आवाज ऐकून महिलांचा स्वत:वरील ताबा सुटला; चक्क जमिनीवर लोळत केला भन्नाट डान्स

या तरुणाच्या भन्नाट युक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १५ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि ६०० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच शेकडो नेटकऱयांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने हे खूप आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय असल्याचं म्हटलं आहे, तर दुसर्‍याने लिहिले “एवढा डिजीटल इंडिया.” तर तिसऱ्या एकाने लिहिलं आहे की, “लोक आजकाल मंत्रदेखील मोबाईलवर लावतात, अरे निदान पूजा करताना तरी मोबाईल बाजूल ठेवा आणि निदान देवाला तरी घाबरा” अशा कमेंट या व्हिडीओवर लोक करत आहेत. त्यामुळे अनेकांना या युवकाची आयडीया आवडली आहे तर अनेकांनी त्याच्यावर टीका केल्याचंही पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 14:43 IST