scorecardresearch

Viral Video: फोटोसाठी जीवघेणा स्टंट; बैलाच्या शिंगाला धरुन फोटो काढायला गेला अन् क्षणात…

सोशल मीडियावर स्वत:चा फोटो इतरांपेक्षा वेगळा असावा यासाठी आजकालची तरुणपिढी कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही

Viral Video: फोटोसाठी जीवघेणा स्टंट; बैलाच्या शिंगाला धरुन फोटो काढायला गेला अन् क्षणात…
एक तरुण फोटो काढण्यासाठी चक्क रस्त्यावर उभ्या असणाऱ्या बैलाची शिंगं धरताना दिसत आहे. (Photo : Twitter)

सोशल मीडियावर स्वत:चा फोटो इतरांपेक्षा वेगळा असावा यासाठी आजकालची तरुणपीढी कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. अनेकवेळा काहीतरी वेगळे फोटो काढून लाईक आणि कमेंट मिळवण्याच्या नादात अनेकांना अपघाताला देखील समोरं जावं लागतं तर काहीजणांनी फोटोच्या मोहापायी आपला जीव गमावल्याच्या बातम्या देखील तुम्ही वाचल्या असतील. तरीदेखील आपला फोटो इतरांपेक्षा वेगळा असावा यासाठी अनेकजण सतत काहीतरी प्रयत्न करत असतात.

शिवाय फोटोसाठी भयंकर स्टंट करणाऱ्या अनेक तरुणाचे व्हिडीओदेखील आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका स्टंटबाज तरुणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण फोटो काढण्यासाठी चक्क रस्त्यावर उभ्या असणाऱ्या बैलाची शिंगं धरताना दिसत आहे.

सुरुवातीली रस्त्यावर उभा असणारा बैल देखील त्या मुलाला चांगला प्रतिसाद देतोय, पण ज्यावेळी हा तरुण उत्साहाच्या भरात बैलाच्या शिंगावर हात ठेवून ती जोराने दाबण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी मात्र बैलाला रागवतो आणि स्टंटबाज तरुणाला एवढ्या जोराचा हिसका देतो की तो तरुण एखाद्या सिनेमातील दृश्याप्रमाणे वरती फेकला गेल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

हेही वाचा- बापरे! सरकारी रुग्णालयात वर्षभरापासून बालरोगतज्ज्ञ म्हणून काम करणारी डॉक्टर निघाली १० वी पास

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. त्यामध्ये एकाने लिहलं आहे की, “लोकांनी आपल्याला सहन होतील, असेच फोटो काढावे नाहीतर हाच फोटो शेवटचा ठरेल.’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने कोणत्याही मुक्या प्राण्याशी फोटो काढताना त्याच्यावर जबरदस्ती करु नये, अन्यथा आपणाला दिवसा तारे दिसतात” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी या व्हिडीओचा आनंद घेतला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ @TheBest_Viral या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. तर आतापर्यंत ५४ हजार लोकांनी पाहिला आहे. तर १,६०० च्या वर लाइक या व्हिडीओला मिळाल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 17:33 IST

संबंधित बातम्या