shocking video : सध्या सगळीकडे पावसाचे वातावरण आहे. थोडा जरी पाऊस आला तरी नदी, नाले, तलाव ओसंडून वाहतात. समुद्राच्या किनारी मोठ्या लाटा उसळतात. अशावेळी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. विशेषत: समुद्रकिनारी जाताना काळजी घेणे गरजेचे आहे पण काही लोक निष्काळजीपणाने वागतात आणि आपला जीव गमावतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. समुद्रकिनारी उभा असलेला तरुण एका मोठ्या लाटेत वाहून जातो. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ((a young man was swept away in a large sea wave Viral Video )

एक मोठी लाट आली अन्..

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला समुद्र दिसेल. समुद्राच्या किनाऱ्यावर लाटा उसळताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला एक तरुण दिसेल जो समुद्राच्या किनाऱ्यावर मोठ्या खडकावर उभा आहे. अचानक एक मोठी लाट येते आणि खडकावर आदळते. समुद्राच्या किनाऱ्यावर उभा असलेला हा तरुण या मोठ्या लाटेत वाहून जातो. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “आयुष्य म्हणजे खेळ नाही. दवाखान्यात बेडवर पडून जगण्यासाठी प्रार्थना करणाऱ्या रुग्णाला विचारा आयुष्याची खरी किंमत”

Viral Reel Shows Child Hanging As Mother Holds Her With One Hand While Posing Sitting On Well's Fence video
“अगं आई ना तू?”, रीलसाठी महिलेनं पोटच्या लेकराला मृत्यूच्या दारात नेलं; VIDEO पाहताना तुम्हीही रोखून धराल श्वास
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
Man lost his balance while sleeping in Mumbai local train viral video
एक डुलकी, एक अपघात! मुंबई लोकलमध्ये झोप लागताच माणसाचा गेला तोल अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का
Boy hold funny poster at lalbaug mumbai video goes viral on social Media
“फक्त गर्दीत हात धरणारी नको…” लालबागमध्ये तरुणाची पाटी पाहून सगळ्याच मुली लाजू लागल्या; असं लिहलंय तरी काय? पाहा VIDEO
Pune shop owner advertise for Renting shop in Puneri way puneri poster goes viral
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! गाळा भाड्यानं देण्यासाठी दुकानाबाहेर लावली जाहिरात; वाचून पोट धरुन हसाल
Mumbai: Video Of Last Man To Take Darshan Of Lalbaugcha Raja Goes Viral
“वेळ बदलायला वेळ लागत नाही” तासाभरापूर्वी रांगेत चेंगरणारा क्षणात VIP झाला; लालबागच्या राजाचा सर्वात नशिबवान भक्त; पाहा VIDEO
Fire caught at home a little boy bravely handle the situation while careless parents enjoying the party viral video
बाप की हैवान! घरात पेट घेताच लहान मुलाने घेतली वडिलांकडे धाव; पण…, पालकांच्या दुर्लक्षामुळे झालं असं काही की, VIDEO पाहून बसेल धक्का
Teacher running towards classroom to resolve fight students gave surprise viral video
विद्यार्थ्यांची मारामारी होताच वर्गात धावत गेली शिक्षिका अन्…, पुढे घडलं काही भलतंच, पाहा VIRAL VIDEO

हेही वाचा : ‘चल तुला पेट्रोल पंपापर्यंत…’ संतापलेल्या बैलाचा दुचाकीस्वारांवर हल्ला; बाईकला ढकलत नेलं अन्… VIDEO पाहून येईल अंगावर काटा

पाहा व्हायरल व्हिडीओ

aprajeet_motivation या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “खरी किंमत आयुष्याची..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “एवढे सुंदर जीवन आहे चांगले जगण्याचा प्रयत्न करा.” तर एका युजरने लिहिलेय, “समुद्रासोबत मस्ती नाही चालत” आणखी एका युजरने लिहिलेय, “शून्य टक्के आहे आयुष्याची किंमत” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा : ‘आयुष्य सर्वांसाठी सारखं…’ प्रवाशाला चहा देण्यासाठी चहा विक्रेत्याची धडपड; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल चटकन पाणी

यापूर्वी सुद्धा काही लोकांनी निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागला. जुन जुलै महिन्यात लोणावळ्यात भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना समोर आली होती. या घटनेने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. याशिवाय ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली येथे एका तरुणाने धबधब्यात उडी मारली आणि पाण्यामध्ये तो वाहून गेल्याचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला होता.