Viral Ukhana Video : उखाणा हा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. लग्न समारंभ असो किंवा कोणत्याही शुभ प्रसंगी आवडीने उखाणा घेतला जातो. उखाणा म्हणजे लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेणे, होय. पूर्वी महिला पतीचे नाव घेत उखाणा म्हणायच्या पण आता पुरुषही आवडीने उखाणा घेताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक नवविवाहित तरुण भन्नाट उखाणा घेताना दिसतो. त्याचा हा उखाणा ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Viral Video : a young newly wed guy said amazing ukhana for his wife and asked his sister how is their sister in law)

तरुणाने घेतला भन्नाट उखाणा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक नवविवाहित जोडपे दिसेल. हा व्हायरल व्हिडीओ गृहप्रवेशाच्या वेळीचा आहे. दारामध्ये दोन बहिणी उभ्या आहेत आणि भावाला उखाणा घेण्यासाठी आग्रह धरताना दिसत आहे. तेव्हा भाऊ म्हणजेच नवविवाहित तरुण उखाणा घेतो. उखाणा घेताना तरुण म्हणतो, “नाव घे म्हणून दरवाज्यावर उभ्या आहेत आडव्या बहिणी, स्वातीचं नाव घेतो, कशी वाटली वहिनी?” हा भन्नाट उखाणा ऐकून बहिणी जोरजोराने हसताना दिसतात. तरुण सुद्धा लाजतो आणि नवी नवरी म्हणजेच त्याची पत्नी सुद्धा हसताना दिसते.

Shocking video Caution For Momo Lovers! Vendor Spotted Kneading Momo Dough With Feet In Jabalpur
तुम्हीही रस्त्यावरचे मोमोज मोठ्या आवडीने खाता ना? विक्रेत्याचा ‘हा’ किळसवाणा VIDEO पाहून झोप उडेल
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Success Story Of Nikunj Vasoya
Success Story: शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये जेवण बनवतो; वाचा थक्क करणारा ‘त्याचा’ प्रवास
a man sings a amazing song kya hua tera wada
“नशा दौलत का ऐसा भी क्या…” व्यक्तीनं गायलं सुरेख गाणं, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “काकांना प्रेमात धोका मिळाला..”
Mumbai local video of some girls dancing on a marathi song Khandalyachya Ghatat Gadi Chale Zokaat in mumbais local train is going viral
मुंबई लोकलमध्ये “खंडाळ्याच्या घाटात गाडी चाले…” गाण्यावर तरुणींचा भन्नाट डान्स; VIDEO तुफान व्हायरल
mollywood actress rape marathi news
अन्वयार्थ: रुपेरी पडद्यावर बलात्काराचे डाग
12 lions chased the leopard
शेवटी राजा तो राजाच; १२ सिंहांनी केला बिबट्याचा पाठलाग अन् पुढच्या पाच सेकंदांत जे घडलं… VIDEO पाहून उडेल थरकाप
Switzerland, Indian tourists, Discriminatory Experiences Indian touris, Switzerland people do discrimination with Indian tourist, discrimination, citizenship, varna, Mahatma Gandhi, Lokmanya Tilak, apartheid, racism,
झाकून गेलेलं..

हेही वाचा : Noida Girl Sexual Assault: ‘पावसात भिजत असताना त्याने माझे कपडे फाडले, नंतर पोलिसांनी…’, तरुणीचे गंभीर आरोप; व्हिडीओ व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : VIDEO: पुणे पोर्शे कार अपघाताची पुनरावृत्ती! अल्पवयीन मुलाने अशी पळवली कार, महिला जागीच ठार; अंगावर शहारे आणणारा अपघात

अभिजीत सावंत या तरुणाने the_abhijeet_sawant या त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जमतय का..?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कडक भावा” तर एका युजरने लिहिलेय, “एक नंबर जोडी” आणखी एका युजरने लिहिलेय, “लय भारी आहे भावा वहिनी” एक युजर लिहितो, “वाह!! रे माझ्या पठ्या, एक नंबर उखाणा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी या तरुणाचे कौतुक केले आहेत. हा उखाणा सेव्ह करुन ठेवतो, असेही काही लोकांनी लिहिलेय. यापूर्वीही असे अनेक उखाण्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत पण हा व्हिडीओ तुम्हाला सर्वात हटके आणि भन्नाट वाटला असेल.